टीपः swt1818.jpg मध्ये फोटो आहे.
39584
नेमळे : कंटेनर रस्त्यालगत उलटून अपघात झाला.
कंटेनर उलटून चालकाचा मृत्यू
नेमळे येथील घटना; झोप लागल्याने अपघात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः कर्नाटकमधून मुंबईच्या दिशेने जात असताना महामार्गावर चालकाला झोप लागल्याने मासे वाहतूक करणारा कंटेनर रस्त्यालगतच्या खाईत उलटून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. मोहम्मद आमीद अशरफ (वय ४२, रा. बेलपू, उडपी, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. त्याच्यासोबत असलेला सहकारी चालक या अपघातात बालंबाल बचावला. ही घटना मुंबई-गोवा महामार्गाच्या झाराप-पत्रादेवी बायपासवर नेमळे-कुंभारवाडी येथे आज पहाटे साडेचारच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, कर्नाटक येथून मुंबईच्या दिशेने आपल्या ताब्यातील कंटेनरमधून चालक मोहम्मद अशरफ हा मासे वाहतूक करत होता. त्याच्यासोबत सहकारी चालक सुलेमान हसन साहब (वय ४३, रा. चित्तूर उडपी, कर्नाटक) हा होता. झाराप पत्रादेवी महामार्गावर नेमळे-कुंभारवाडी येथे आज पहाटे चालक मोहम्मद याला झोप आल्याने त्याचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले व कंटेनर रस्त्यालगतच्या खाईत पलटी झाला. कंटेनर दोन-तीन वेळा पलटी झाल्याने या अपघातात मोहम्मद अशरफ हा जागीच ठार झाला. सुदैवाने सुलेमान हा बालंबाल बचावला.
अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलिस हवालदार मनोज राऊत, पोलिस हवालदार गलोले यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली व घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघाताची फिर्याद मृत मोहम्मद याचा सहकारी सुलेमान याने सावंतवाडी पोलिसांत दिली. मृत चालक मोहम्मद अशरफ याच्याविरोधात अपघात करून स्वतःच्या मृत्यू तसेच सहकाऱ्याच्या दुखापतीस व गाडीच्या नुकसानीस कारणीभूत प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.