कोकण

पॅरिसमधील बॅटमिंटन स्पर्धेत आरुष पावसकर उपविजेता

CD

45609

पॅरिसमधील बॅटमिंटन स्पर्धेत
आरुष पावसकर उपविजेता

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १६ ः पॅरिस (फ्रान्स) येथे खेळविलेल्या १७ वर्षांखालील फ्रान्स ओपन बॅटमिंटन स्पर्धेचे मुळ बांदा येथील व गोव्यातून खेळत असलेल्या आरुष पावसकरने उपविजेतेपद पटकावले. अटितटीच्या अंतिम फेरीत त्याचा डेन्मार्कच्या अॅक्सल बोसेनकडून १५-२१, २२-२०, २३-२१ असा निसटता पराभव झाला.
थिवी (बार्देस) येथील रहिवासी असलेला आरुष हा बांद्याचा नातू आहे. १७ वर्षांखालील गटात भारताचे प्रतिनिधीत्व करणारा तो एकमेव बॅडमिंटनपटू होता. त्याने पहिल्या फेरीत इंग्लंडच्या जोएल जॉबीचा २१-१८, २१-१४ असा पराभव केला. त्यानंतर त्याने फ्रान्सच्या व्हिक्टर ले रॉक्सचा २१-९, १४-२१, २१-१७ असा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. त्यानंतर त्याने स्वित्झर्लंडच्य क्वेटिंग बॉशंगचा २१-१८, २१-९ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. उपांत्य फेरीत त्याने इंग्लंडच्या साजन सेंथूरन याचा २४-२२, २१-१८ असा पराभव करून थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, संघर्षमय अंतिम लढतीत त्याला डेन्मार्कच्या अॅक्सल बोसेनकडून पराभव पत्करावा लागल्याने त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत त्याने पहिला सेट १५-२१ असा जिंकून विजेतेपदाकडे वाटचाल सुरु केली होती. मात्र, दुसरा व तिसरा सेट २२-२० व २३-२१ अशा फरकाने गमाविल्याने थोडक्यात यशाने हुलकावणी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT