जिल्हा कबड्डी संघात
सिद्धी वनकेची निवड
रत्नागिरी ः जयगड नांदिवडे येथील सिद्धी वनके या विद्यार्थिनीची राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते २७ फेब्रुवारीदरम्यान मनमाड (नाशिक) येथे होणार आहे. सिद्धी ही जयगड विद्यामंदिरची विद्यार्थिनी आहे. शालेय शिक्षण घेताना तिने कबड्डीच्या अनेक स्पर्धांमध्येदेखील सहभाग घेतला आहे. शालेय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये तिने चमकदार कामगिरी केली आहे. याच दमदार कामगिरीच्या जोरावर तिची 36व्या किशोर/किशोरी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या अंतिम बाराजणांच्या संघात निवड करण्यात आली आहे. जिल्हा संघात तिची निवड होताच भाजपचे तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे यांच्यासह जयगड पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तिचे विशेष अभिनंदन केले.
---
शिवतरमध्ये सोमवारपासून
नामदार चषक स्पर्धा
खेड : शिवतर येथील ओम साई क्रिकेट क्लबच्यावतीने २४ ते २६ रोजी नामदार चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्याला ३३ हजार ३३३ रुपये, उपविजेत्याला २२ हजार २२२ रुपये आणि रूपक देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर यांनाही चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यशस्वीतेसाठी श्रीकांत नलावडे, मंगेश मोरे, शुभम विचारे, दिगंबर मोरे, राकेश मोरे, अक्षय मोरे आदी प्रयत्नशील आहेत.
---
देवघर येथे रविवारी
कबड्डी स्पर्धा
खेड : तालुक्यातील देवघर येथील खेम पद्मावती क्रीडा मंडळाच्यावतीने २३ फेब्रुवारी रोजी तालुकास्तर निमंत्रित कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्याला ५ हजार ५५५ रुपये, उपविजेत्याला ३ हजार ३३३ रुपये, तृतीय क्रमांकाला २ हजार २२२ रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी १ हजार १११ रुपये व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. वैयक्तीकमध्ये उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड, सर्वोत्कृष्ट खेळाडू यांनाही गौरवण्यात येणार आहे. यशस्वीतेसाठी किरण मोरे, ओमकार मोरे, विकास सागवेकर, शुभम जाधव, सोहम मोरे, अविराज मोरे आदी प्रयत्नशील आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.