कोकण

आंगणेवाडी जत्रोत्सव नियोजनाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

CD

46050

आंगणेवाडी जत्रोत्सव नियोजनाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

२२ ला सोहळा ः विविध प्रशासकीय विभागांना योग्य सूचना

सकाळ वृत्तसेवा
मसुरे, ता. १८ ः आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा जत्रोत्सव शनिवारी (ता.२२) होत आहे. या जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आंगणेवाडी येथे भेट देत विविध प्रशासकीय विभागांच्या जत्रा पूर्व नियोजनाचा आढावा घेतला. आंगणेवाडीमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून योग्य खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. आंगणे कुटुंबियांच्या सहकार्यातून जत्रोत्सव यशस्वीरित्या पार पाडूया, असे यावेळी जिल्हाधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले.
व्यासपीठावर अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषीकेश रावले, कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी घनःशाम आढाव, मालवण तहसीलदार वर्षा झालटे, मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सचिव काका आंगणे, बाळा आंगणे, बाबू आंगणे, सतीश आंगणे आदी उपस्थित होते.
यावेळी मालवण पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, आरोग्य विभागाचे डॉ. सुबोध इंगळे, डॉ. संजय पोळ, ‘एसटी’च्या गौतमी काळे, अनिरुद्ध सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजित पाटील, स्नेहा लोखंडे, ग्रामपंचायत प्रशासक एस. डी. चव्हाण, विस्तार अधिकारी पी. डी. जाधव, ग्रामपंचायत अधिकारी युगल प्रभूगावकर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे संतोष सावर्डेकर, प्रकाश कात्रे, गौरव गावित, साईनाथ चव्हाण, राजश्री सामंत, मंडल अधिकारी श्रीमती एम. एस. चव्हाण, तलाठी रवी तारी, पोलिस प्रमोद नाईक, विवेक फरांदे, कैलास ढोले, पोलिसपाटील पंकज आंगणे, मंडळाचे माजी अध्यक्ष भास्कर आंगणे, मधु आंगणे आदी उपस्थित होते. बाळा आंगणे यांनी आभार मानले.
-----------
जत्रा परिसरात ३५ सीसीटीव्ही
भाविकांना तसेच व्यावसायिकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी प्रशासनाकडून पाच पाण्याचे टँकर मिळावेत, अशी मागणी बाबू आंगणे यांनी केली. देवालय व जत्रा परिसरात ३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती अनंत आंगणे यांनी दिली. जीर्ण वीज खांब बदलावेत, आग प्रतिबंधक यंत्रणा प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या दुकानात ठेवावी. रस्त्यावर व्यापाऱ्यांना बसायला परवानगी देऊ नये आदी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
---
वैद्यकीय कक्ष, पाच रुग्णवाहिका
आरोग्य विभागाकडून दोन वैद्यकीय कक्ष उभारण्यात येणार असून ५ रुग्णवाहिका तैनात असतील, अशी माहिती देण्यात आली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन टीम तयार ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला केल्या. बीएसएनएलकडून आणखी एक हंगामी टॉवर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली. खासगी कंपनीचा गतवर्षीप्रमाणे हंगामी टॉवर उभारावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
---
यात्रा विशेष १२० एसटी बस
एसटी विभागातर्फे १२० यात्रा विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. देवगड, आंगणेवाडी, मालवण ही बसफेरी अनियमित असल्याबाबत बाळा आंगणे यांनी नाराजी व्यक्त केली. पाच अग्निशमक गाड्या, १० मोबाइल टॉयलेट नगरपालिका पुरवणार असल्याची माहिती दिली. जत्रेच्या दिवशी रात्री ताटे लावण्याच्या कार्यक्रमानंतर मंदिर परिसरात जादा पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी बाळा आंगणे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

Ruturaj Gaikwad: 'काळजी नको, लवकरच मी...', ऋतुराज खराब फॉर्मवर स्पष्ट बोलला; CSK च्या खराब फिल्डिंगबद्दल काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update: नेस्को सेंटर मध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणात लायझनिंग करणारा इंद्रजीत सिंग याला तात्काळ अटक करा; मनसेची मागणी

चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

SCROLL FOR NEXT