

Ruturaj Gaikwad
Sakal
IPL 2026 CSK vs KKR Marathi News: चेन्नई सुपर किंग्स संघाची आयपीएल २०२६ स्पर्धेतील सुरुवातीला घसरलेली गाडी आता रुळावर येत आहे. पहिल्या तीन सामन्यातील पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सने घरच्या मैदानात सलग दोन विजय मिळवले आहेत. नुकतेच कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मंगळवारी (१४ एप्रिल) चेन्नईने ३२ धावांनी पराभूत करत हंगामातील दुसरा विजय मिळवला.
मात्र सध्या चेन्नईला कोणची चिंता सतावत असेल, तर ती कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) फॉर्मची. गेल्या काही हंगामात ऋतुराज चेन्नईच्या फलंदाजी फळीचा कणा राहिला आहे. त्याने सातत्याने चांगल्या धावा केल्या होत्या.
मात्र यंदा त्याला पहिल्या पाचही सामन्यात एकदाही अर्धशतक करता आलेलं नाही. त्याने अनुक्रमे ६, २८, ७, १५, ७ अशा धावांच्या खेळी केल्या आहेत. त्याला याबाबत सामन्यानंतर प्रश्नही विचारण्यात आला होता, ज्यावर त्याने उत्तर देताना म्हटले की तो सध्या चांगल्या मनस्थितीत असून लवकरच त्याच्याकडून मोठी खेळी होईल.