कोकण

मिठबाव येथील शिबिरात ६० जणांची दंत चिकित्सा

CD

46065

मिठबाव येथील शिबिरात
६० जणांची दंत चिकित्सा

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १८ : मिठबाव येथील जीवन शिक्षण शाळा क्र. १ मध्ये दिविजा वृद्धाश्रमार्फत मोबाईल दंत चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ६० जणांची दातांची तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्‍घाटन उपसरपंच सौ. फाटक व डॉ. मेहुल जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
असलदेतील स्वस्तिक फाउंडेशन संचलित दिविजा वृद्धाश्रमाकडून या वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसह गोर-गरिबांसाठी विविध ठिकाणी अनेक उपक्रम आयोजित केले जातात. खेड्या-पाड्यांतील गोरगरीब जनतेला दातांचे उपचार करणे पैशाअभावी शक्य होत नाही. ग्रामीण खेड्या-पाड्यात दंत चिकित्सा दवाखाने नसल्याने दातांचे इलाज करणे वयोवृद्ध लोकांना शक्य होत नाही. अशा लोकांच्या सेवेसाठी दिविजा वृद्धाश्रमाने त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोबाईल दंत चिकित्सक शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये व अविनाश फाटक यांनी केले. मुंबईहून डॉ. किसन गारगोटे, डॉ. ऋतिक गारगोटे यांनी रुग्णाचे उपचार केले. संस्थेचे सदस्य संजय धवन यांचे सहकार्य मिळाले. या कार्यक्रमास मिठबाव गावचे ग्रामस्थ व दिविजा वृद्धाश्रमामधील कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT