- rat१८p३५.jpg-
२५N४६०७६
रत्नागिरी ः येथील सर्वंकष विद्यामंदिरमध्ये आयोजित शैक्षणिक परिषदेला उपस्थित मान्यवर.
----
शिक्षणातील बदलावर शैक्षणिक परिषद
सर्वंकष विद्यामंदिर ; उद्योगप्रधान कौशल्यांवर भर द्या
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः शिक्षणप्रणालीतील बदल, सध्याच्या प्रणालीची स्थिती आणि भविष्यातील संधी यावर विचारमंथन करण्यासाठी सर्वंकष विद्यामंदिर येथे शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेला जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशील शिवलकर, लायन्स क्लब अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर, सतीश कामत, उदय लोध, सुहास विध्वंस, डॉ. अमोल पटवर्धन यांच्यासह सर्वंकष विद्यामंदिरचे दीपक गद्रे आणि मीना गद्रे उपस्थित होते. विचार आणि कृती दोन्ही बाबींची सांगड घालून आपली प्रगती करणारा विद्यार्थी असावा, अशी संकल्पना राबवली पाहिजे असे शिवलकर यांनी सांगितले तर डॉ. बेडेकर म्हणाले, विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात असला तरीही तो समर्पण, निष्ठा, निर्धार, परिश्रम या मुल्यांचा अंगीकार करणारा असला पाहिजे. यानंतर उपस्थितांनी सध्याच्या शिक्षणपद्धतीतील सुधारणा, कौशल्याधारित शिक्षण, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि अध्यापन पद्धतीतील नवकल्पना यावर आपले विचार मांडले. भविष्यातील करिअर संधी, उद्योजकता तसेच विद्यार्थ्यांसाठी नवे शैक्षणिक धोरण आणि मार्गदर्शक तत्त्वे यावरही विचारविनिमय झाला. सर्वंकष विद्यामंदिरसारख्या प्रशालेने शाळेत खेळ आणि त्यातील करियर यावर लक्ष केंद्रित करून काम केले पाहिजे, अशी सूचना या वेळी करण्यात आली. या परिषदेत ऑनलाईन माध्यमातून शहरातील पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिषदेचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका मोनिका जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.