कोकण

फिनोलेक्स ॲकॅडमीमध्ये रोबोटिक्स कार्यशाळेला प्रतिसाद

CD

rat१८p२७.jpg-
P२५N४६०११
रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये अर्डिनो कार्यशाळेत रोबो कारनिर्मितीचे प्रात्यक्षिक देताना प्रा. रूपेश इंगळे. दुसऱ्या छायाचित्रात कार्यशाळेत तयार झालेल्या रोबो मोटार.

रोबोटिक्स कार्यशाळेला प्रतिसाद
‘फिनोलेक्स’मध्ये आयोजन ; विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : येथील फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रिकल विभागातर्फे द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘अर्डिनो ः बेसिक्स टू ऑटोमेशन अँड रोबोटिक्स’ ही दोनदिवसीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद लाभला. कार्यशाळेत ६०हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांना होम ऑटोमेशन, स्मार्ट सिंचन प्रणाली, अडथळा शोधणारी यंत्रणा आणि लाइन फॉलोअर रोबो यासारख्या स्वयंचलित प्रणालींबाबत प्रत्यक्ष अनुभव मिळाला. तांत्रिक कौशल्यांसह त्यांनी विविध सेन्सर आणि इलेक्ट्रॉनिक घटकांचा वापर करून प्रकल्प विकसित केले. कार्यशाळे दरम्यान प्रोग्राम केलेली रोबो कार आणि लाइन फॉलोअर रोबो कार या दोन स्वयंचलित यंत्रणांचे यशस्वी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली.
प्रा. रूपेश इंगळे यांनी अर्डिनो युनो प्रोग्रामिंग, सेन्सर इंटरफेसिंग, ऑटोमेशन आणि रोबोटिक्स यावर सखोल मार्गदर्शन केले तर इलेक्ट्रिकल विभागप्रमुख डॉ. जयंत माने यांनी अर्डिनोचा वैयक्तीक व औद्योगिक प्रकल्पांमध्ये वापर कसा करता येईल यावर भर दिला. डॉ. जयंत माने यांनी मार्गदर्शन केले. संयोजन प्रा. सुदीप हालदार यांनी केले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाची सखोल माहिती मिळाल्याचे सांगितले. त्यांनी यापुढे स्वतंत्रपणे रोबोट तयार करण्याची आत्मविश्वासपूर्वक तयारी असल्याचेही मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी या कार्यशाळेबद्दल कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: इस्लामाबादमधील तिढ्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT