कोकण

दापोलीत लवकरच शिवसेनेचा नगराध्यक्ष

CD

४६१२५


दापोलीत लवकरच शिवसेनेचा नगराध्यक्ष
राज्यमंत्री योगेश कदम : पाच नगरसेवकांचा प्रवेश; विकासासाठी पाठीशी राहणार
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १८ : नगरपंचायतीच्या निवडणुकांवेळी शिवसैनिकांनी केलेला संघर्ष आज फळाला आला आहे. आज या पाचही नगरसेवकांनी आमच्यावर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे लवकरच नगरपंचायतीत शिवसेनेचाच नगराध्यक्ष होईल, असे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दापोलीतील अन्वर रखांगे, विलास शिगवण, मेहबूब तळघरकर, अश्विनी लांजेकर, संतोष कळकुटके या पाच नगरसेवकांनी वेगळा गट करून मंगळवारी (ता. १८) शिवसेनेमध्ये प्रवेश केला. राज्यमंत्री कदम यांनी त्यांचे स्वागत केले.
ते म्हणाले, ‘नगरपंचायतीच्या निवडणुकीवेळी शिवसैनिकांनी संघर्ष केला होता. त्या वेळेस जो अन्याय झाला त्याला वाचा फोडण्याचे काम शिवसैनिकांनी केले. मात्र, त्यावेळी नगरपंचायतीमध्ये सत्ता स्थापन करू शकलो नाही. त्यावेळी निवडून आलेले आपले दोन अपक्ष नगरसेवक आज नगरपंचायतीमध्ये आहेत. आज या पाच जणांनी आमच्यावर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे दापोलीचा पुढील नगराध्यक्ष शिवसेनेचाच होईल. दापोली शहराचा जो विकास थांबला आहे तो होणे आवश्यक आहे. निधी मिळून विकासकामांना सुरुवात करणे गरजेचे आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तसेच महायुतीच्या माध्यमातून एकजुटीने या शहराचा विकास करायचा आहे. त्यासाठी मंत्री म्हणून नेहमीच तुमच्या पाठीशी उभा आहे.’’


कोट
ज्या वेळी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला, त्यावेळी आम्हाला वाटले की, कुठेतरी आमच्या विभागामध्ये कामे होतील; परंतु आजपर्यंत एकही काम झालेले नाही. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या तालुक्यातील कामांचा झपाटा पाहून आम्ही ठरवले की, आपल्या विभागाचा विकास व्हायचा असेल तर त्यांच्यासोबत गेले पाहिजे. म्हणून कोणतीही अपेक्षा न ठेवता विकासकामांसाठीच शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.
- विलास शिगवण, नगरसेवक, दापोली नगरपंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी दोघांना अटक

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT