rat18p42.jpg-
N46143
रत्नागिरी : गोगटे महाविद्यालयात पत्रकारिता अभ्यासक्रम सांगता कार्यक्रमात बक्षीस देताना राजेंद्रप्रसाद मसुरकर. डावीकडून प्रा. कृष्णात खांडेकर, डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. शाहू मधाळे.
----------
विविध कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत
मसुरकर; गोगटे महाविद्यालयात पत्रकारिता अभ्यासक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : समकाळात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विविध कौशल्ये आत्मसात केली पाहिजे, तरच भविष्यकाळात येऊ घातलेल्या विविध आव्हानांना आपण सामोरे जाऊ शकू, असे प्रतिपादन रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केले.
गोगटे - जोगळेकर महाविद्यालयातील हिंदी विभागाच्यावतीने आयोजित पत्रकारिता कौशल्य या अभ्यासवर्गाच्या सांगता समारोपप्रसंगी ते बोलत होते.
महाविद्यालयात पीएम उषा अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या अनुदानातून विद्यार्थ्यांसाठी विविध प्रमाणपत्र, कौशल्य विकसन आणि व्यावसायिक कौशल्यावर आधारित अभ्यासवर्गांचे आयोजन करण्यात आले.
हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे यांनी विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. अध्यक्षस्थानावरून उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी म्हणाल्या, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे समाजाला योग्य माहिती देणे आवश्यक आहे. त्यासाठी पत्रकार होण्यासाठी पत्रकारितेचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळणे आवश्यक आहे. हिंदी विभागाने आयोजित केलेला हा अभ्यासवर्ग उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मीनल यादव हिने प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. या अभ्यासवर्गाचे समन्वयक म्हणून प्रा. कृष्णात खांडेकर यांनी नियोजन केले.
---------
चौकट १
‘सकाळ’च्या कार्यालयास भेट
अभ्यासवर्गात विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे मूलभूत सैद्धांतिक ज्ञान, बातमीलेखन, कौशल्ये शिकविण्यात आली. विद्यार्थ्याना पत्रकारितेतील कामकाजाचा प्रत्यक्ष कार्यानुभव मिळावा म्हणून दैनिक सकाळच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयास क्षेत्रभेट देण्यात आली. या अभ्यासवर्गात शिरीष दामले, श्रीकृष्ण देवरुखकर, संदीपन लावडे, प्रा. वंदना पाटील, प्रा. वसुंधरा जाधव या पत्रकारितेच्या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.