rat19p22.jpg-
46248
रत्नागिरीः शहरातील मारूतीमंदिर येथे ओमेगा-२ या साहित्य दालनात दैनिक सकाळ समुहाच्या प्रकाशन साहित्य दालनाचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी. या प्रसंगी ओमेगाच्या पौर्णिमा तावडे, कश्मिरा तावडे, नदीम रावळ, राजेश कळंबटे, राजेश शेळके, चिनार नार्वेकर आदी.
''सकाळ'' प्रकाशनाची पुस्तके मिळणार रत्नागिरीत
मारूतीमंदिरच्या ओमेगा स्टेशनरीत नवे दालन; पोलिस अधीक्षकांच्या हस्ते आरंभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ ः वाचनाची ओढ वाढावी आणि लोकांपर्यत उत्तम साहित्य पोचावे यासाठी दैनिक सकाळ समुहातर्फे शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून रत्नागिरीतील मारूती मंदिर येथील ओमेगा-२ या शालेय साहित्य दालनात वाचकांसाठी ‘सकाळ’ प्रकाशनाची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या दालनाचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते आज झाले.
मारूती मंदिर येथे सुरू झालेल्या ओमेगामधील साहित्य दालनाच्या उद्घाटनावेळी ओमेगाचे मालक गिरीधर तावडे, पौर्णिमा तावडे, कश्मिरा तावडे तसेच प्रसिद्ध वास्तूविशारद संतोष तावडे, ‘सकाळ’ प्रकाशन पुणेचे वरिष्ठ व्यवस्थापक नदीम रावळ, राजेश कळंबटे, राजेश शेळके, चिनार नार्वेकर, नरेश पांचाळ, दत्तप्रसन्न कुलकर्णी उपस्थित होते. या प्रसंगी दालन पाहिल्यानंतर पोलिस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, ''सकाळ'' प्रकाशनाची अनेक पुस्तके वाचण्याचा योग आला आहे. यातील गोष्ट पैशापाण्याची हे प्रफुल्ल वानखडे यांचे पुस्तक आधीही वाचलेले आहे. अतिशय वाचनीय तसेच आध्यात्मिक आणि आरोग्यविषयक पुस्तके येथे पाहायला मिळाली. रत्नागिरीत असे पुस्तक दालन झाले, ही समाधानाची गोष्ट आहे. पालक, विद्यार्थी आणि वाचकांनी वाचनसंस्कृती प्रबळ व्हावी यासाठी प्रयत्न करावेत आणि येथील पुस्तकांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.
''सकाळ'' प्रकाशनाच्या या साहित्य दालनात अध्यात्म, आर्थिक, इतिहास आणि अन्य विषयांत ज्ञानसमृद्ध बनणारे साहित्य एकाच ठिकाणी वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे. या दालनातील सर्व पुस्तके ३१ मार्चपर्यंत २५ टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वाधिक विक्री झालेले गोष्ट पैशापाण्याची आणि नुकतेच प्रकाशित सकल जनवादी छत्रपती शिवराय हे पुस्तक येथे वाचकांसाठी उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.