IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

Rohit Sharma injury update: सलग तीन सामने पराभूत झालेल्या मुंबई इंडियन्स संघाची चिंता रोहित शर्माच्या दुखापतीमुळे वाढली आहे. आता रोहित पंजाब किंग्सविरुद्धही खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे.
Rohit Sharma

Rohit Sharma

Sakal

Updated on

IPL 2026 Mumbai Indians Marathi news: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्सची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. स्पर्धेच्या सुरुवातीला अनेक अपेक्षा मुंबई इंडियन्स संघाकडून केल्या जात होत्या, मात्र प्रत्यक्षात पहिला सामना जिंकल्यानंतरचे तिन्ही सामने मुंबई इंडियन्सने गमावले आहेत. त्यामुळे सध्या मुंबई इंडियन्स पाँइंट्स टेबलमध्येही ९ व्या क्रमांकावर आहेत.

यातच त्यांना आता आणखी मोठा धक्का चौथा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध रविवारी (१२ जुलै) बसला. या सामन्यादरम्यान, मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा दुखापतग्रस्त (Rohit Sharma Injury) झाला होता. त्यामुळे आता तो त्यांच्या आगामी सामन्यात खेळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.

<div class="paragraphs"><p>Rohit Sharma</p></div>
IPL 2025, RCB vs LSG: रिषभ पंतच्या लखनौसमोर आज धडाकेबाज बंगळुरू संघाचे पारडे जड आव्हान, कशी असेल Playing XI
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com