Rat19p36.jpg
46341
मंडणगड : शिवसेनेतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रवेशकर्त्यांचे स्वागत करताना गृहराज्यमंत्री योगेश कदम.
-------------
मंडणगड नगरपंचायतीवर लवकरच शिवसेनेचा भगवा
गृहराज्यमंत्री योगेश कदम ; नगरसेवकांच्या निकटवर्तीयांच्या प्रवेशाने खळबळ
एक नजर
* मिशन टायगरचे मंडणगडमध्येही संकेत
* विद्यमान नगरसेवकांमध्ये कुरबुरीची चर्चा
* नगरपंचायतीत काटावरचे बहुमत
* विकास करण्याचे मंत्र्यांकडून आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १९ः विकासाच्या वाटेवर नगरपंचायत अग्रेसर होण्यासाठी परिवर्तन करत लवकरच मंडणगड नगरपंचायतीवरही शिवसेनेचा भगवा फडकवू, असे गृहराज्यमंत्री आमदार योगेश कदम यांनी मंडणगड येथील कार्यक्रमात देत दापोलीप्रमाणेच परिवर्तन घडवून आणणार असल्याचा सुतोवच केला आहे. तसेच येथील नगरसेवकांच्या निकटवर्तीयांनीच उबाठाला जय महाराष्ट्र करीत धनुष्यबाण हाती घेतल्यामुळे मंडणगडमध्येही मिशन टायगरचे संकेत मिळू लागले आहेत.
वाढदिवसानिमित्त मंडणगड येथे शिवसेनेकडून आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेवेळी ते बोलत होते. या प्रसंगी ते म्हणाले, मंडणगड शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता अग्रक्रम दिलेला आहे. शहरातील पायाभूत सुविधांसह प्रभागांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत आहेत. प्रभागाच्या पायाभूत सुविधांकरिता राज्य शासनाकडून भरघोस विकास निधी मिळवून दिला आहे. या वेळी महायुतीचा नगराध्यक्ष सत्तेत बसणे गरजेचे आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या विकासाला आणखीन गती मिळणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा वरचष्मा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंडणगड येथे झालेल्या कार्यक्रमात नगरसेवक सुभाष सापटे यांच्या पत्नी शुभदा सापटे, नगरसेविका समृद्धी शिगवण यांचे पती शैलेश शिगवण, नगरसेविका राजेश्री सापटे यांचे पती दिनेश सापटे, नगरसेवक मुकेश तलार यांचे वडील अनंत तलार या नगरसेवकांच्या निकटवर्तीय नातेवाईकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे नगरपंचायतीत सत्ताबदलाची चर्चा सुरू झाली आहे. त्याला गृहराज्यमंत्री कदम यांच्या वक्तव्यामुळे जोड मिळाली आहे.
चौकट
काठावरचे बहुमत
मंडणगड नगरपंचायतीत सध्या काठावरचे बहुमत आहे. महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सत्तेत असला तरीही विकासकामांचे प्रश्न व निधीच्या असमान वितरणावर नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. मंत्री कदम यांनी सत्ताबदलाचे संकेत दिल्यामुळे नगरपंचायतीच्या सत्ताकारणात वेगवान घडामोडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.