कोकण

साखरपा-दाभोळे-कनकाडी रस्त्याची तात्पुरती डागडुजी

CD

rat19p42.jpg
46356
साखरपा : दाभोळे कनकाडी रस्त्याचे खड्डे भरताना कर्मचारी.
----------

दाभोळे-कनकाडी रस्त्याची तात्पुरती डागडुजी
साखरपा, ता. १९ : दाभोळे कनकाडी रस्त्याची अखेर डागडुजी केली आहे. सततच्या अवजड वाहतुकीमुळे पडलेले खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्यात आले आहेत.
दाभोळे कनकाडी हा सुमारे दीड किलोमीटरच रस्ता या गेल्यावर्षी तीस लाख खर्च करून नव्याने बांधण्यात आला. यात रस्त्याचे रूंदीकरण आणि डांबरीकारण करण्यात आले; पण पावसाळ्यात या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. रस्त्यावर सातत्याने डंपरची वाहतूक सुरू असते. त्यामुळे वाहतुकीमुळे हा रस्ता जागोजागी उखडला होता. ठिकठिकाणी तयार झालेले खड्डे आणि त्या खड्ड्यांमध्ये टाकण्यात आलेली मोठी खडी यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी आणखीच धोकादायक झाला होता.
या खडीवरून वाहने घसरून लहान-मोठे काही अपघातही झाले होते. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी व्हावी, अशी मागणी सातत्याने होत होती. रस्त्याच्या तात्पुरत्या पॅचिंगचे काम सध्या सुरू आहे. ज्या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत आणि ज्या ठिकाणी अवजड वाहतुकीमुळे रस्ता खचला आहे त्या ठिकाणी खडी टाकून त्यावर डांबऱ ओतण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे काही काळ तरी या मार्गावरून वाहतूक सुरळीत होईल, अशी आशा ग्रामस्थ आणि वाहनचालक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी दोघांना अटक

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT