कोकण

‘ज्ञानी मी होणार’ परीक्षेमध्ये कर्तव्यला यश

CD

47573

‘ज्ञानी मी होणार’
परीक्षेमध्ये
कर्तव्यला यश
सावंतवाडी ः डॉट कॉम्स असोसिएशन संस्थेमार्फत शिवजयंतीनिमित्त आयोजित सामान्य ज्ञान व बुद्धिमत्तेवर आधारित ‘ज्ञानी मी होणार २०२५’ परीक्षेत सातवी ते आठवीच्या गटात येथील आरपीडी प्रशालेचा सातवीतील विद्यार्थी कर्तव्य बांदिवडेकर याने विजेतेपद पटकावले. त्याला रोख रकमेचे पारितोषिक तसेच आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या यशस्वीतेसाठी व प्रशालेला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल कर्तव्यचे तसेच मार्गदर्शक शिक्षक, पालकांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत, मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड, उपमुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, पर्यवेक्षक एस. एन. पाटील, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक आदींनी अभिनंदन केले.
-------
47572

राज्य कबड्डी
स्पर्धेसाठी
समीक्षाची निवड
सावंतवाडी ः मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेची नववीतील विद्यार्थिनी समीक्षा वरक हिची नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबाबत मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबई संस्थेचे अध्यक्ष शिवराम मळगावकर, सचिव आर. आर. राऊळ, कार्याध्यक्ष नंदकिशोर राऊळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर राऊळ, प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले, पर्यवेक्षक सुनील कदम, क्रीडा सल्लागार डॉ. शरद शिरोडकर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ यांनी तिचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Prices : इराण-अमेरिका युद्धाचा थेट फटका! गॅस सिलिंडर महाग; आजपासून नवे दर लागू, किती झाली किंमत?

अग्रलेख : उजेडातील रोषणाई!

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT