कोकण

शिवरायांचा इतिहास तरुणांपर्यंत पोहोचवा

CD

swt261.jpg
47775
तुळसुलीः जिल्हा परिषद शाळा तुळसुली चव्हाटाच्या वतीने सुनील पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संजय सावंत, संजना वारंग आदी. (छायाचित्रः अजय सावंत)

शिवरायांचा इतिहास तरुणांपर्यंत पोहोचवा
सुनील पवारः तुळसुली शाळेत विद्यार्थी गुणगौरव सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ः शिवरायांचा खरा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचविणे हे प्रत्येक मावळ्याचे कर्तव्य आहे, म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात, गावागावांत महाराजांचा इतिहास पोहोचला पाहिजे. महाराजांचा पराक्रम तरुण पिढीपर्यंत पोहोचला तरच देशाला उज्वल भवितव्य राहील, असे प्रतिपादन शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती किल्ले रायगड अध्यक्ष सुनील पवार यांनी तुळसुली येथे आयोजित कार्यक्रमात केले.
तालुक्यातील जिल्हा परिषद तुळसुली चव्हाटा शाळेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन श्री. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे संजय सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा संजना वारंग, शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष समृद्धी सातार्डेकर, मुख्याध्यापक श्री. कालेलकर, परशुराम वारंग, पुरुषोत्तम तळसुलकर, भानुदास वारंग, संजय सावंत, गौतमी सावंत, सावंत गुरुजी, तन्वी तळसुलकर आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, ‘‘आजच्या तरुणांना विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना शिवचरित्राची ओळख झाली पाहिजे. शिवकालीन वस्तूंचा अभ्यास आजच्या तरुण पिढीने करावा. शिवरायांचा इतिहास. तत्कालीन शस्त्रे, भांडी, चलन याचा अभ्यास महत्त्वाचा आहे. शिवरायांचा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचविणे हे प्रत्येक मावळ्याचे कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्येकाने घेऊन वाटचाल केली पाहिजे. रायगड किल्ल्यावर गेली ३५१ वर्षे राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा होत आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात संगणकीय क्षेत्रात वाटचाल करताना विद्यार्थ्यांनी भविष्याचे वेध घेणारे स्वप्न पाहावे. जिद्द, चिकाटी, मेहनत या त्रिसूत्रीसह आत्मविश्वास सोबत घेऊन स्वप्नांचा पाठलाग करावा. तुळसुलीसारख्या ग्रामीण भागातून आयपीएस अधिकारी झाल्यास गावासाठी निश्चितच भूषणावह राहील. विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून यशाच्या दिशेने झेप घ्यावी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT