कोकण

इन्फिगो आयकेअरकडून प्रशिक्षण

CD

अश्विनी करकरे देणार महिलांना
दागिने तयार करण्याचे प्रशिक्षण
इन्फिगो फाउंडेशन; उद्यापासून साळवी स्टॉप येथे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : इन्फिगो फाउंडेशनने सामाजिक जाणिवेतून रत्नागिरीमध्ये आधुनिक ज्वेलरी तयार करण्याचे प्रशिक्षण शहरी व ग्रामीण भागातील महिलांसाठी खास आयोजित केले आहे. मुंबईच्या सुप्रसिद्ध डिझाईन व ज्वेलरी मेकर अश्विनी करकरे या प्रशिक्षण देणार आहेत.
गुरुवारी (ता. ६) रोजी सकाळी ११ ते ६ या वेळेत शहरी महिलांसाठी तर शुक्रवारी (ता.७ ) रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत ग्रामीण भागातील महिलांसाठीचे हे प्रशिक्षण साळवी स्टॉप येथील इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल येथे होणार आहे. आजकाल विविध प्रकारची ज्वेलरी बाजारात उपलब्ध आहे. मुली, महिलांना अशी आकर्षक ज्वेलरी फार आवडते. अनेकांना अशी आधुनिक ज्वेलरी स्वतः करायची इच्छा असते. हाच मुद्दा विचारात घेऊन इन्फिगो फाउंडेशनने या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.
शहरी महिलांसाठी फक्त १०० रुपये तर ग्रामीण महिलांसाठी ५० रुपये नोंदणीशुल्क आहे. यामध्ये लागणारे विशेष प्रकारचे साहित्य इन्फिगो फाउंडेशनतर्फे देण्यात येणार आहे याशिवाय स्वतः तयार केलेला बांगड्या, हार व कानातले असा संच प्रत्येकीला मिळणार आहे तोही मोफत. पाचजणींच्या गटाने नोंदणी केल्यास गटाला कात्र्यांचा एक संच मोफत मिळणार आहे. चहा, नाश्त्याची सोय करण्यात आली आहे. मुंबईच्या सुप्रसिद्ध डिझाईन व ज्वेलरी मेकर करकरे ज्वेलरी शिकवणार आहेत. नोंदणी करणाऱ्यांना कार्यक्रमाविषयी अधिक तपशील वैयक्तीक कळवण्यात येईल. अधिकाधिक महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे इन्फिगो फाउंडेशनतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT