कोकण

रेशन दुकानातील सर्व्हर डाऊनने गोंधळ

CD

रेशन दुकानातील सर्व्हर डाऊनने गोंधळ
‘पॉस प्रणाली’चा बोजवारा ; लाभार्थी रांगेत तिष्ठत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः रास्त दराच्या धान्य दुकानासाठीच्या धान्य वितरण व्यवस्थेतील सर्व्हर डाऊन झाल्यामुळे पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला असून, पॉस मशिन प्रणालीद्वारे धान्य देणे त्रासदायक ठरत आहे. शासनाने पॉस मशिनवरच धान्य वितरित करा, अशा सूचना रेशन दुकानदारांना दिल्यामुळे लाभार्थ्यांना धान्य घेण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागत आहे.
राज्याचा सर्व्हर डाऊन असल्याने ई-पॉस मशिन संथगतीने चालत आहेत. कधी कधी तर पूर्णपणे ठप्प होतात. अनेकदा थांबूनही ई-पॉस मशिन पुन्हा सुरू होईल याची शाश्वती नसते. अशावेळी लाभार्थ्यांना धान्य वितरण कसे करायचे, असा प्रश्न पडतो. मशिनमधील त्रुटींमुळे धान्य वितरित होत नसल्याने दुकानदारांचे कमिशनही काढले जात नाही. दुर्गम भागात कनेक्टिव्हिटीची समस्या येत असल्याने दुकानदारांनी वायफाय घेतले आहे; पण राज्याचेच सर्व्हर डाऊन असल्याने पॉस मशिनची समस्या कायम आहे. लाभार्थ्यांना वारंवार खेटे मारावे लागत असल्याने दुकानदार आणि लाभार्थी यांच्यात खटकेही उडत आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनयमाअंतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत ई-पॉस मशिनद्वारे लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करून धान्य वितरण करण्याचे शासनाने निर्देश आहेत; परंतु गेल्या काही दिवसांपासून सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे धान्य वितरणात अडथळे येत आहेत. शासनाने तांत्रिक अडचणी दूर होत नाही तोवर ऑफलाइन धान्य वितरणास परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत; मात्र अजून त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. पॉस मशिन अपडेट झाल्यानंतर सर्व्हर डाऊनची समस्या वारंवार येत आहे. या संदर्भात येत असलेली अडचण शासनाला कळवण्यात आली असून, त्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
---
तातडीने उपायोजना करा...
रास्त दराच्या धान्य वितरण व्यवस्थेतील सर्व्हर डाऊन होत असल्याने लाभार्थींना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते, प्रसंगी धान्यासाठी हेलपाटे माराव्या लागतात. याची दखल प्रशासाने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी लार्भार्थींकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT