कोकण

चिपी विमानतळाला हवे बळ

CD

49058

चिपी विमानतळाला हवे बळ

तांत्रिक मर्यादा : ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’कडून प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ ः चिपी विमानतळ पूर्ण क्षमतेने चालू करण्यासाठी मर्यादा आहेत. येथे नाईट लँडिंगची सोय होणे आवश्यक आहे. शिवाय मुंबई फेरी सुरू करण्यासाठी तेथे स्लॉट मिळणेही गरजेचे आहे, असे ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीतर्फे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरच्या शिष्टमंडळाला सांगितले. हे अडथळे दूर करण्यासाठी केंद्रस्तरावर प्रयत्न करण्याची ग्वाही शिष्टमंडळाने दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण विभागाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ दीपक परब, गव्हर्निंग कौन्सिल मेंबर राजन नाईक व संतोष राणे यांनी ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीच्या गोवा येथील मुख्य कार्यालयात कंपनीचे मालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून ‘फ्लाय ९१’ची उड्डाणे नियमित होण्यासाठी आग्रही निवेदन दिले. प्रामुख्याने सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा सुरू होण्यासाठी कंपनीने प्रयत्न करावेत, अशी मागणी ‘मासिया’तर्फे करण्यात आली. त्यावेळी ही सेवा सुरू होण्यासाठी मुंबई विमानतळावर ‘फ्लाय ९१’ कंपनीला स्लॉट मिळणे अत्यावश्यक असल्याचे विमान कंपनीनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे स्लॉट मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे सांगण्यात आले. तसेच नवी मुंबई येथे सुरू होत असलेल्या नवीन आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर सिंधुदुर्ग विमानतळावरून येणाऱ्या-जाणाऱ्या विमान कंपन्यांसाठी स्लॉट मिळविण्यासाठी ‘मासिया’तर्फे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांसोबत चर्चा करून विशेष प्रयत्न केले जातील, असे सांगण्यात आले.
सिंधुदुर्ग विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा अद्याप सुरू न झाल्यामुळे तथा पूर्ण क्षमतेने मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे बऱ्याचदा दृश्यमानतेमध्ये अडथळा आल्याने सिंधुदुर्ग विमानतळावर येणारी विमाने ऐनवेळी मोपा-गोवा येथील विमानतळावर वळविण्याची वेळ येते, अशी खंत कंपनीने व्यक्त केली. या अडचणी वेळीच दूर झाल्या तर सिंधुदुर्ग विमानतळ निश्चितपणे पूर्ण क्षमतेने सुरू राहू शकतो, असे मत कंपनीने व्यक्त केले.
यावेळी उपाध्यक्ष परब व नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती सिंधुदुर्ग विमानतळासाठी पोषक आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे, स्थानिक आमदार दीपक केसरकर, कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे, माजी खासदार तथा माजी एव्हिएशन मिनिस्टर सुरेश प्रभू हे निश्चितपणे सिंधुदुर्ग विमानतळावरील तांत्रिक अडचणी दूर करून प्रवासी वाहतूक नियमित होण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास बोलून दाखविला. ‘मासिया’तर्फे लवकरच या सर्वांची भेट घेऊन विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंती करण्यात येणार असल्याचे परब व नाईक यांनी सांगितले. सिंधुदुर्ग विमानतळाच्या धावपट्टीची बांधणी लक्षात घेता या ठिकाणी ठराविक विमान कंपन्याच प्रवासी विमान वाहतूक करू शकतात, असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी ‘फ्लाय ९१’चे मालक मनोज चाको, महसूल अधिकारी आशुतोष चिटणीस, व्यवस्थापक निमिष जोशी, वितरण व्यवस्थापक सतीश खाडे उपस्थित होते.
...............
नियमित फेऱ्यांसाठी प्रयत्न होणार
सिंधुदुर्ग-सोलापूर, सिंधुदुर्ग-पुणे, सिंधुदुर्ग-नाशिक, सिंधुदुर्ग-छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग-जळगाव, सिंधुदुर्ग-हैदराबाद व सिंधुदुर्ग- बंगळूर ही विमान सेवा सुरू करण्याविषयी निवेदन देऊन विस्तृत चर्चा करण्यात आली. त्यालाही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तत्वतः मान्यता देत लवकरच या सेवा ही नियमित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे आश्वासित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT