कोकण

देवगड हायस्कूलचा १०७ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात

CD

49080

देवगड हायस्कूलचा १०७ वा
वर्धापन दिन सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ४ः येथील शेठ म. ग. हायस्कूलचा १०७ वा वर्धापन दिन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. यावेळी हायस्कूलच्या ‘श्रीराम’ या वार्षिक हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. मंचावर माजी मुख्याध्यापक चंद्रकांत शिंगाडे, स्थानीय समिती सदस्या अनुश्री पारकर, मुख्याध्यापक महादेव घोलराखे, पर्यवेक्षिका निशा दहिबावकर आदी उपस्थित होते.
श्री. शिंगाडे यांनी, विद्यार्थ्यांनी अधिकाधिक प्रगती करून स्वतःबरोबरच आपल्या शाळेचा नावलौकिक वाढवावा. शाळेप्रती असणारे प्रेम, आदर अधिकाधिक वृद्धिंगत करावे आणि शाळेला सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर १०७ वी ज्योत पेटविण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या ''श्रीराम'' या वार्षिक हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.
शाळेचे सहाय्यक शिक्षक रोहित बांदिवडेकर यांच्यावतीने वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा आदर्श विद्यार्थी पुरस्कार सहावीतील प्रज्योत कदम आणि आठवीमधील स्वराली मिराशी या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आला. त्यांना एक हजार रुपये व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. श्री. घोलराखे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक निशा दहिबावकर यांनी केले. सूत्रसंचालन सागर कर्णिक यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT