कोकण

सावर्डेतील राधाकृष्ण मंदिरात सप्ताह

CD

सावर्डेतील राधाकृष्ण
मंदिरात सप्ताह
सावर्डेः सावर्डे काजरकोंडवाडी येथील श्री राधाकृष्ण मंदिरात ८ ते ११ मार्च या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. पहाटे चार ते सहा काकड आरती, सायंकाळी सहा ते सात हरिपाठ व रात्री नऊ ते अकरा कीर्तन असा कार्यक्रम होणार आहे. ८ला वैभव कदम, ९ला गजवडीकर बाबा महाराज, १०ला नारायण पवार, ११ला अरूण विरधनकर यांचे कीर्तन होणार आहे. या आध्यात्मिक कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
------------
डॉ. नीरज हजारे यांना
बीडीएस पदवी प्रदान
साडवली ः देवरूखचे प्रसिद्ध कॅरमपटू मोहन हजारे यांचे सुपुत्र नीरज हजारे यांना भारती विद्यापीठ पुणे येथील पदवीदान समारंभात बीडीएस (बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी) पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी लोकसभा स्पीकर ओम बिर्ला, भारती डेन्टल युनिव्हर्सिटीचे विश्वजित कदम आदी उपस्थित होते. नीरज यांनी सांगली येथील कॉलेजमधून ही पदवी मिळवली आहे. पुढे ते एमडीएस करणार आहेत. राष्ट्रीय कॅरमपटू द्रोण हजारे यांचे ते थोरले बंधू आहेत.
---------
ज्ञानरश्मी वाचनालयात
रंगभरण, निबंध स्पर्धा
गुहागरः ज्ञानरश्मी वाचनालय येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात झाला. या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा घेण्यात आली. या वेळी राजेंद्र आरेकर, प्रशांत साटले, वाचनालयाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय पर्शुराम गुरव गुरूजी, हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, प्रभुनाथ देवळेकर, अरूणा पाटील आदी उपस्थित होते. प्रा. मनाली बावधनकर यांनी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज हे नाव कसे पडले या विषयी माहिती दिली. रंगभरण स्पर्धेत छोट्या गटात स्वरा वायंगणकर, अनुज बामणे, जिया जोशी; पहिली ते चौथी गटात आयुष जोशी, रूंजी जोशी, सर्वेश जोशी; पाचवी ते सातवी गटात अपेक्षा मुरकुटे, वल्लभ सरकार, गोजिरी मुळे यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. निबंध स्पर्धेत पाचवीमध्ये सानवी खातूने प्रथम, सहावीमध्ये दुर्वा नाटेकरने, सातवीमध्ये शर्वरी कदमने प्रथम क्रमांक मिळवला. सर्व विद्यार्थ्यांना वाचनालयातर्फे सन्मानचिन्ह व भेटवस्तू देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT