कोकण

शिक्षक, शिक्षकेतरांचे उद्या धरणे आंदोलन

CD

शिक्षक, शिक्षकेतरांचे
उद्या धरणे आंदोलन
दोडामार्ग, ता. ४ : माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदासाठी पात्र असणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी संरक्षणासह शिक्षक पदावर विनाअट पदोन्नती द्यावी, माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी बक्षी समितीने शिफारस केल्याप्रमाणे नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजना दहा, वीस, तीस वर्षांनंतरचा लाभ तत्काळ लागू करावी, माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी पदभरती तत्काळ सर्व जिल्ह्यांत सुरू करावी आदी मागण्यांसाठी सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (ता. ६) सकाळी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष अनिल राणे, कार्याध्यक्ष प्रदीप सावंत, सचिव गजानन नानचे, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांनी केले आहे.

रिक्षा संघटनेची आज
सिंधुदुर्गनगरीत बैठक
सिंधुदुर्गनगरी, ता. ४ ः सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षाचालक मालक संघाचे आज रजिस्ट्रेशन झाले. त्यामुळे संघाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आणि रिक्षाचालक-मालक यांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी या संघाची बैठक गुरुवारी (ता. ६) सकाळी १० वाजता येथील श्री देव रवळनाथ मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. रिक्षाचालक मालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष नागेश ओरोसकर यांनी केले आहे. या बैठकीत रजिस्ट्रेशन व जिल्हा कार्यकारिणीबाबत माहिती देणे, तालुकाध्यक्ष निवड, विविध समस्यांवर चर्चा तसेच अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करून त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. रिक्षाचालक मालकांनी या बैठकीस उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: पूर्व वर्धमान जिल्ह्यातील गोपालदासपूर येथील 500 वर्ष जुन्या राखल राजा मंदिरात पोयला बैशाखची प्रार्थना करण्यासाठी भाविक दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT