कोकण

कणकवलीत पदर प्रतिष्ठानतर्फे महिला दिनी विविध कार्यक्रम

CD

कणकवलीत पदर प्रतिष्ठानतर्फे
महिला दिनी विविध कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. ४ : महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पदर महिला प्रतिष्ठानतर्फे यंदाही जागतिक महिला दिनाचे आयोजन केले आहे. यानिमित्त ७ आणि ८ मार्च रोजी विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांचा महिलांनी आनंद घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मेघा गांगण यांनी केले आहे.
गांगण म्हणाल्या, ‘‘पारंपरिक पदार्थांची पाककला स्पर्धा ७ मार्च रोजी होणार असून, यावर्षी स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ‘पारंपरिक पदार्थ’ हा विषय आहे. सहभागी महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून लक्ष्मी-विष्णू हॉलमध्ये सायंकाळी ४ वाजता आपले पदार्थ सादर करायचे आहेत. या स्पर्धेत महिलांचा सृजनशीलतेला वाव मिळणार असून, त्यासोबतच जुन्या परंपरांना नव्याने उजाळा देण्याचा प्रयत्न होणार आहे. तसेच याच दिवशी संगीत खुर्ची, रस्सीखेच, दोरी उडी, बादलीत बॉल टाकणे यासारख्या फनी गेम्सच्या माध्यमातून महिलांना मनमुराद आनंद घेता येणार आहे. तसेच फॅशन शो आणि विशेष सत्कार सोहळा होईल.’’
‘‘८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी आकर्षक ‘मिस साज सखी’ आणि ‘मिसेस साज सखी’ हा फॅशन शो आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या आत्मविश्वासाला उजाळा मिळणार आहे. याशिवाय, कणकवली शहराच्या नावलौकिकासाठी विशेष योगदान दिलेल्या महिलांचा सन्मान होणार आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रतिष्ठानतर्फे गौरविण्यात येईल. सांस्कृतिक कार्यक्रम आणि लकी ड्रॉची मेजवानी आहे. या सोहळ्यात स्वागतगीत, गणेश वंदना, नाटिका आणि रेकॉर्ड डान्स यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम रंगत आणतील. तसेच, दरवर्षीप्रमाणे यंदाही लकी ड्रॉचे आयोजन केले आहे,’’ असेही यावेळी सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Heatwave : विदर्भात उन्हाची लाट कायम; अकोला-अमरावती राज्यात ‘हॉट’, पुढचे चार दिवस 'येलो अलर्ट'

MPSC Success Story भावंडांची स्पर्धा परीक्षेत भरारी! पल्लवीची धर्मादाय विभागात, तर पंकजची महसूल सहाय्यक पदाला गवसणी, सातत्य अन् कठोर मेहनतीचे फळ..

यंदाचा मे महिना 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर ! ट्रिपल राजयोगाचा फायदा, पैशांची बरसात आणि करिअरमध्येही होणार प्रोमोशन

Land Measurement: शेतकऱ्यांना दिलासा! जमीन मोजणीमध्ये तंत्रज्ञानाची क्रांती, प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार, ५२ रोव्हर यंत्रांमुळे कामाला गती..

महाराष्ट्र हादरला! गुप्तधनासाठी स्मशानात अघोरी पुजा, कासव-घुबडासह विधवा-कुमारिकांचा वापर

SCROLL FOR NEXT