कोकण

भजन परंपरेमुळे अध्यात्माची जोपासना

CD

50322

भजन परंपरेमुळे अध्यात्माची जोपासना

अतुल बंगे ः हरिचरणगिरीत जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः ग्रामीण भागातील युवक भजन परंपरा जोपासण्यासाठी पुढाकार घेऊन स्पर्धा आयोजित करतात, ही अध्यात्माकडची यशस्वी वाटचाल आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते अतुल बंगे यांनी केले.
स्वरसंगीत भजन मंडळ हरिचरणगिरी-कोंडुरा (ता. वेंगुर्ले) आयोजित विठ्ठल पंचायतन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटन बंगे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
श्री. बंगे पुढे म्हणाले, ‘‘प. पू. दादा पंडित यांचे दत्तस्थान हे पवित्र तीर्थस्थान आहे. इथे नामस्मरण आणि भक्ती यावर भर दिला जातो. विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा या पवित्र स्थानामध्ये येथील युवकांच्या पुढाकाराने भजन स्पर्धा आयोजित करुन पुढील पिढीला एक आदर्श घालून दिला आहे. हे कार्य अध्यात्माच्या द़ृष्टीने निश्चितच कौतुकास्पद आहे. मी भागातील सामाजिक, धार्मिक क्षेत्रात सरपंच अवी दुतोंडकर यांच्या माध्यमातून नेहमीच सहभागी होत असतो. यापुढेही या भागातील प्रत्येक सामाजिक व धार्मिक कार्यक्रमासाठी माझे सहकार्य आणि सहभाग असेल.’’
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुडाळ तालुका भाजपा अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनीही आपले विचार मांडले. व्यासपीठावर सरपंच अवी दुतोंडकर, उपसरपंच धोंड, ह.भ.प. अवधुत नाईक, परीक्षक आनंद मोर्ये, योगेश प्रभू, पोलिसपाटील साक्षी धुरी, आंदुर्ले सरपंच अक्षय तेंडुलकर, ग्रामपंचायत सदस्य महेश मुननकर आदी उपस्थित होते. आंदुर्ले ग्रामपंचायत सदस्य भगत यांनी प्रास्ताविक केले. सरपंच दुतोंडकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT