कोकण

सुकन्या योजना ठरतेय तरुणींचा आधार

CD

-rat१०p२२.jpg-
२५N५०३४३
सावर्डे ः वालावलकर सुकन्या योजनेत सहभागी झालेल्या किशोरवयीन मुलींसोबत वैद्यकीय अधिकारी
------
काही सुखद---लोगो

सुकन्या योजना ठरतेय जिल्ह्यातील तरुणींचा आधार
वालावलकर रुग्णालयाचा उपक्रम ; ६० हजार किशोरींचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १० : स्त्री हीच समाजाची नियंत्रक शक्ती आहे. तिलाच जर उत्तम आरोग्य प्रदान केले तर पुढे जाऊन चारित्र्यवान आणि निरोगी समाजाचे स्वप्न पूर्ण होईल, हा विचार अग्रभागी ठेवून मुलींचे आणि महिलांचे सक्षमीकरण करणे ही आधुनिक काळाची गरज आहे, हे लक्षात घेऊन डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाने सुकन्या योजनेची सुरवात २००९ मध्ये केली. या योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील शाळा आणि महाविद्यालयातील एकूण ५९ हजार १५७ किशोरींपर्यंत पोचून त्यांना जागृत करण्याचे कार्य केले आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश ११ ते २० वर्षे वयोगटातील मुलींमध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करून स्वावलंबी करणे, असा आहे. या निवासी शिबिरात उत्तम निवास आणि स्वादिष्ट भोजनाची सोय केली जाते. पहाटे लवकर उठणे, ध्यान, योगासने याचे प्रशिक्षण आणि प्रार्थना याने दिवसाची सुरवात होते. शारीरिक आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता सत्र आयोजित केले जाते. बॉडी कॉम्पोझिशन या तंत्रज्ञानाने वजन, उंची व्यतिरिक्त शरीरातील पाणी, कॅल्शियम, स्नायू, चरबी याचेही मोजमाप केले जाते. आवश्यक असल्यास तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला घेऊन अॅनिमिया, जंत यावर रक्तवाढीच्या, कॅल्शियमच्या गोळ्या, जीवनसत्वे आणि आवश्यक असल्यास मुलींना पूरक आहार म्हणून संस्थेने तयार केले पौष्टिक लाडू दिले जातात. मुलींचे अनेक चाचण्यांद्वारे मूल्यमापन करतात आणि उदासीनता किंवा तणाव असल्यास त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शिकवले जातात. सायंकाळी क्रीडांगणावर अॅथलेटिक्स, खो-खो, कबड्डी आदी खेळ खेळले जातात. किशोरीवयातील समस्या जसे की, लैंगिक शिक्षण, वयात येणे, मासिक पाळी आणि योग्य पोषक आहार याबाबत व्याखाने आयोजित केली जातात. संस्थेने स्थापन केलेल्या ड्रीम हेल्थ पार्कला भेट हा तर सर्वत्र आवडीचा विषय झाला आहे. कारण, अनेक खेळाद्वारे हसतखेळत उत्तम आरोग्याचे धडे यात दिले जातात. शिबिरात सहभागी झालेल्या मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि व्यावसायिक कौशल्ये यासाठी कौशल्य विकास केंद्राला भेट दिली जाते. शिबिरात सहभागी झालेल्या अनेक मुलींनी त्यामुळे प्रोत्साहित होऊन फॅशन डिझाईन, ब्युटिशियन, नर्सिंग परिचारिका, संगणक कौशल्य अशा अनेक विषयात प्रावीण्य मिळवून आपल्या पायावर उभे राहण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
----
योजनेला मानपत्र
सुकन्या योजनेसाठी रुग्णालयातील डॉ. सुवर्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अनुभवी सायकॉलॉजिस्ट स्वाती सोनावणे आणि रूपाली चव्हाण यांच्या पथकाने मोलाचा वाटा उचलला आहे. मुलींना योग्य दिशा दाखवल्याबद्दल कोलकाता येथील इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटने सुकन्या योजनेला मानपत्र देऊन कौतुकही केले आहे.
-------------
कोट
एमआरसी युके या इंग्लंडमधील संस्थेचे डॉ. कॅरोलिन फॉल यांच्या मार्गदर्शनाखाली किशोरवयातील मुला-मुलींच्या समस्या यावर एक संशोधनपर उपक्रम राबवला आहे. जेणेकरून किशोरावस्थेत समाजाने त्यांच्या शारीरिक, मानसिक, आरोग्य व योग्य आहार, मैदानी खेळ यावर भावी पिढी निरोगी होण्यासाठी विशेष लक्ष पुरवणे गरजेचे आहे हे अधोरेखित झाले आहे.

-डॉ. सुवर्णा पाटील, संचालिका, वालावलकर रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT