rat१०p१३.jpg -
२५N५०३३४
जलजीवन योजनेतील पाईपलाईन.
दोषींवर कारवाई न झाल्यास महाराष्ट्र दिनी आंदोलन
मनोहर गुरव ः जलजीवनमधील कामांच्या दर्जाकडे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १० ः रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा दर्जा योग्य नाही. त्यामुळे हर घर जल पोचवण्याचे स्वप्न अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे भंगलेले आहे. याची सखोल चौकशी करावी अन्यथा महाराष्ट्र दिनी आंदोलन करू, असा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते मनोहर गुरव यांनी दिला आहे.
संगमेश्वर ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे पूर्व अभियंता यांची सखोल चौकशी करावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रशासनाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले आहे. अधिकाऱ्यांची व झालेल्या कामांची परिपूर्ण चौकशी व स्ट्रक्चरल ऑडिट होत नाही तोपर्यंत निधी उपलब्ध करू नये, अशी मागणीही गुरव यांनी केली आहे. काही ठिकाणी कामे झालेली दाखवून उपअभियंता यांनी निधी लाटला आहे. त्याचप्रमाणे अर्जदारांनी केलेली मागणी माहिती अधिकारात दिली जात नाही. नागरिकांनी आपल्या हक्कासाठी जागृत होणे काळाची गरज आहे. जलजीवन मिशन योजना ही कुटुंबांसाठी असून, त्यांचे गांभीर्य अधिकाऱ्यांना नाही. त्यामुळे निधीचा दुरूपयोग केला गेला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकरणात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी चौकशी करून ही योजना पारदर्शी व्हावी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
-----
पाण्यासाठी वणवण
जलजीवन योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबांना कायमस्वरूपी पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र त्यांचे पाण्याचे स्वप्न कडक उन्हाळ्यात धुळीला मिळाले आहे. अनेक महिला आजही भरउन्हातून डोक्यावर हंडा घेऊन डोंगरदऱ्यातून पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. ही योजना वेळेत पूर्ण झाली असती तर ही वेळ आली नसती, असे मत गुरव यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.