Abhishek Sharma, Axar Patel Must Report Whereabouts Under NADA Rules
esakal
Abhishek Sharma Axar Patel NADA registered testing pool IPL 2026 : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये आता कुठे रंगत निर्माण झालेली असताना राष्ट्रीय उत्तेजक-विरोधी संस्थेने ( नाडा ) ने त्यांच्या नोंदणीकृत चाचणी गटात (RTP) अभिषेक शर्मा व अक्षर पटेल यांच्या नावाचा समावेश केला आहे. या खेळाडूंना आता ते कुठे जातात, याची माहिती द्यावी लागेल. तीन वेळा ठावठिकाण्याची माहिती देण्यात अयशस्वी झाल्यास, ते उत्तेजक द्रव्य सेवनाचे उल्लंघन मानले जाईल. त्यांचे नाव या यादीत समावेश केल्यानंतर नाडाचे पथक कोणत्याची क्षणी त्यांची चाचणी करण्यासाठी पोहचू शकेल आणि त्यांना ती द्यावी लागेल.