कोकण

राजापूर अर्बनच्या अध्यक्षपदी संजय ओगले

CD

P२५N५०४३७
-rat१०p४२.jpg
ः राजापूर ः राजापूर अर्बन बँकेचे नूतन अध्यक्ष संजय ओगले आणि उपाध्यक्ष विजय पाध्ये यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना माजी अध्यक्ष अनामिका जाधव, माजी उपाध्यक्ष विवेक गादीकर.
-----
राजापूर अर्बनच्या अध्यक्षपदी ओगले
निवड बिनविरोध ; उपाध्यक्षपदी विजय पाध्ये
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १० ः राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. त्यात सत्ताधारी सर्वपक्षीय सहकार पॅनेलचे संजय ओगले यांची अध्यक्षपदी तर विजय पाध्ये यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
राजापूर अर्बन बँकेवर सर्वपक्षीय सहकार पॅनेलचे वर्चस्व असून, सहकार पॅनेलकडून पाच वर्षासाठी सर्वपक्षीय संचालकांना अध्यक्ष व उपाध्यक्षपदी संधी देता यावी यासाठी एक धोरण निश्‍चित करून अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कार्यकाळ निश्‍चित करण्यात आला होता. त्याप्रमाणे सहकार पॅनेलकडून अनामिका जाधव यांना अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्षपदासाठी विवेक गादीकर यांना संधी देण्यात आली होती. या दोघांनीही आपली मुदत संपल्याने आपापल्या पदांचे राजीनामे दिले होते. संचालक मंडळाच्या बैठकीत ते मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी सहकार विभागाकडे पाठवण्यात आले होते.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक अविनाश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. बँकेच्या संचालक मंडळावर वर्चस्व असलेल्या सत्ताधारी सर्वपक्षीय सहकार पॅनेलमध्ये यापूर्वी अध्यक्षपदासाठी ओगले तर उपाध्यक्षपदासाठी पाध्ये यांची नावे निश्‍चित करण्यात आलेली होती. त्याप्रमाणे अध्यक्ष म्हणून ओगले तर, उपाध्यक्षपदी पाध्ये यांची बिनविरोध निवड झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT