कोकण

लायन्सच्या श्रेया केळकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

CD

-rat११p२०.jpg-
२५N५०५८१
रत्नागिरी : लायन्स क्लबच्या श्रेया केळकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करताना प्रांतपाल ॲड. एम. के. पाटील.
----------
‘लायन्स’च्या श्रेया केळकर यांचा
आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : लायन्स इंटरनॅशनलच्या प्रांत ३२३४ ड १ मधील कोकण विभागातील उपविभाग ३च्या उपविभागीय प्रमुख श्रेया केळकर यांना लायन्स इंटरनॅशनलच्या झोन चेअरमन या विभागातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लायन्स इंटरनॅशनलच्या प्रथेनुसार वर्षभर केलेल्या कामाचे योग्य ते निरीक्षण करून लायन्स इंटरनॅशनलतर्फे दिला‌ जाणारा हा पुरस्कार पुढील वर्षात घोषित केला जातो. कोकण विभागीय परिषदेत प्रांतपाल ॲड. एम. के. पाटील यांच्या हस्ते तो केळकर यांना प्रदान केला. केळकर यांच्या उपविभागात लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी, संगमेश्वर, देवरूख, हातखंबा रॉयल व न्यू रत्नागिरी या पाच क्लबचा समावेश आहे. या मार्फत वर्षभर विविध उपक्रम राबवले. त्यामुळे प्रांतात हे क्लब टॉप १० मध्ये होते. होम क्लबचे म्हणजेच लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे विशेष मोलाचे सहकार्य व‌ योगदान मिळाल्याचे केळकर यांनी सांगितले. त्यासाठी तत्कालीन अध्यक्षा शिल्पा पानवलकर, सचिव संजय पटवर्धन, खजिनदार श्रद्धा कुळकर्णी, टीमचे आभार मानले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

Ruturaj Gaikwad: 'काळजी नको, लवकरच मी...', ऋतुराज खराब फॉर्मवर स्पष्ट बोलला; CSK च्या खराब फिल्डिंगबद्दल काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update: नेस्को सेंटर मध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणात लायझनिंग करणारा इंद्रजीत सिंग याला तात्काळ अटक करा; मनसेची मागणी

चौधरी बिहारचे नवे 'सम्राट', मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी, नितीशकुमार उपस्थित

SCROLL FOR NEXT