भरणेत कायस्थ प्रभू
समाजाचे स्नेहसंमेलन
खेड ः जिल्हा चांद्रसेनीय प्रभू समाजाचे स्नेहसंमेलन भरणे येथील हॉटेल बिसू येथे राष्ट्रीय अध्यक्ष समीर गुप्ते यांच्या उपस्थितीत झाले. जिल्हा संस्थापक अध्यक्ष सुनील चिटणीस यांनी स्वागत केले. राज्य माहितीखात्यातून सेवानिवृत्त झालेल्या देवेंद्र भुजबळ यांनी आपली सामाजिक बांधिलकी या विषयावर व्याख्यान दिले. अखिल भारतीयचे उपाध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे यांनी समाज एकत्र येणे गरजेचे आहे यावर भाष्य केले. या वेळी मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, रत्नागिरी तालुक्यातील समाजबांधव सहभागी झाले होते.
---
काळकाई क्रीडा
केंद्राला विजेतेपद
खेड ः तालुका कबड्डी असोसिएशन व भरणे काळकाई कला क्रीडा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने भरणे येथील तु. बा. कदम महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित पुरुष व महिला अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत काळकाई कला क्रीडा संघाने विजेतेपद पटकावले. जय गणेश क्रीडा मंडळाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय पंच दादा बैकर, काळकाई एजन्सीचे सुजित शिंदे व तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश चिकणे यांच्या हस्ते झाले. याचवेळी जिल्हा किशोर गट जिल्हा संघातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सुमित राठोड व राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या आशिष गोगावले यांचा सन्मान करण्यात आला.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.