कोकण

आरोंदा रस्ताप्रश्‍नी आता आंदोलन

CD

50644

आरोंदा रस्ताप्रश्‍नी प्रसंगी आंदोलन

कांबळींचा इशारा ः मंजूर काम सुरू न झाल्याने संताप


सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः कोंडुरा तळवणेमार्गे आरोंदा रस्त्याचे काम दोन दिवसांत सुरु न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष तथा तळवणे ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश कांबळी यांनी दिला आहे. याप्रश्नी पालकमंत्र्यांचे लक्षही वेधणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कोंडुरा तळवणेमार्गे आरोंदा या रस्त्याचे काम डिपॉझिट हेडमधून मंजूर आहे. या कामाची वर्क ऑर्डर होऊन दोन महिने उलटले तरीही ठेकेदार काम सुरू करत नसल्याने स्थानिकांमध्ये याबाबत तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. या रस्त्याच्या बाजूने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने दोन वर्षांपूर्वी नळ योजनेसाठी जलवाहिनी टाकली होती. या कामामुळे हा संपूर्ण रस्ता नादुरुस्त झाला होता. त्यानंतर हा रस्ता डिपॉझिट हेडमधून मंजूर करण्यात आला. त्यासाठी फेब्रुवारीमध्ये वर्क ऑर्डरही काढण्यात आली. मात्र, बांधकाम विभागाकडून नेहमीच दोन दोन दिवसांची मुदत वाढवून घेतली जात असल्याचा आरोप श्री. कांबळी यांनी केला आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे नादुरुस्त झाला असून यावर अनेक अपघात होत असतात.
---
बांधकाम विभागाची अनास्था
अपघातांची मालिका थांबविण्यासाठी या रस्त्याचे काम त्वरित होणे आवश्यक असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनास्थेमुळे ते रखडले असल्याचा आरोपही कांबळी यांनी केला आहे. त्यामुळे आता दोन दिवसांत या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच याबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याचेही श्री. कांबळी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

Vidarbha Heatwave : विदर्भात उन्हाची लाट कायम; अकोला-अमरावती राज्यात ‘हॉट’, पुढचे चार दिवस 'येलो अलर्ट'

MPSC Success Story भावंडांची स्पर्धा परीक्षेत भरारी! पल्लवीची धर्मादाय विभागात, तर पंकजची महसूल सहाय्यक पदाला गवसणी, सातत्य अन् कठोर मेहनतीचे फळ..

यंदाचा मे महिना 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर ! ट्रिपल राजयोगाचा फायदा, पैशांची बरसात आणि करिअरमध्येही होणार प्रोमोशन

Land Measurement: शेतकऱ्यांना दिलासा! जमीन मोजणीमध्ये तंत्रज्ञानाची क्रांती, प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार, ५२ रोव्हर यंत्रांमुळे कामाला गती..

SCROLL FOR NEXT