कोकण

संभाजी भिडे गुरूजींचे साडवलीत व्याख्यान

CD

कळंबणी रुग्णालयात
१८ ला आरोग्य शिबिर
खेडः तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात १८ मार्चला सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत आरोग्य सेवा शिबिर आयोजित केले आहे. शिबिरात ०-१८ वयोगटातील विविध आजारांनीग्रस्त बालकांवर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातील तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी व उपचार तसेच आवश्यक बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अंगणवाडीतील कुपोषित बालकांना खेड रोटरी क्लबमार्फत मोफत प्रोटीन पावडर, टॉनिक तसेच अन्य औषधांचे वाटप करण्यात येणार आहे.
----------------
संभाजी भिडे गुरूजींचे
साडवलीत व्याख्यान
साडवलीः श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान देवरूख विभागातर्फे साडवली येथील बने स्कूलच्या मैदानात २४ मार्चला सायंकाळी ५.३० वा. धर्मवीर बलिदान दिन या विषयावर संभाजी भिडे गुरूजी यांचे व्याख्यान होणार आहे. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या सहवासाने पावन झालेल्या संगमेश्वर धर्मभूमीमध्ये छत्रपती श्री संभाजी महाराजांचा इतिहास व त्यांचे बलिदान यामुळे जिवंत असलेल्या हिंदुस्थानचे वास्तव अनुभवण्यासाठी व धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी हिंदू बंधू-भगिनींनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन गणेश गायकवाड, श्रीधन बाळेकुंद्री यांनी केले आहे.
-----------
कडवई धामणाकवाडीत
जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा
साडवलीः संगमेश्वर तालुक्यातील कडवई धामणाकवाडी येथील संघर्ष मित्रमंडळातर्फे जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन २० मार्चला रात्री ८ वाजता करण्यात आले आहे. स्पर्धा लहान गट (वय १ ते १५), मोठा गट (१६ ते पुढे) या गटात होणार आहे. विजेत्यांना रोख रक्कम व चषक देण्यात येईल. ज्या स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी संयोग धामणाक, दिनेश गीते, नीलेश धामणाक, विनोद धामणाक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष संजय धामणाक यांनी केले आहे.
---------
घरडा महाविद्यालयात
शोध कार्यक्रम
चिपळूणः खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात शोध २०२५ हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या झाला. तंत्रज्ञान समुदायात नवोन्मेष, सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढवणे, ज्ञानाच्या सीमा ओलांडण्यासाठी आणि भविष्यातील प्रगतीला प्रेरणा देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात स्पीड प्रोग्रामिंग, लॅन गेमिंग, सर्किट मेकिंग, पोस्टर प्रेझेंटेशन, टाउन प्लॅनिंग, स्टार्ट-अप् आयडिया (बी-प्लॅन), प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, पझल कट्टा, कॅड मॉडेलिंग, टेक्निकल क्विझ प्रेझेंटेशन यासारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेते व उपविजेत्यांना पारितोषिकांसह प्रमाणपत्र व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT