कोकण

चिपळूण-गोवळकोटचा पावटा बाजारात

CD

50949

गोवळकोटचा पावटा बाजारात
मोंगा पार्टीसाठी सर्वाधिक मागणी; किलोला ३०० रुपये दर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः गोवळकोट येथे सध्या थंडीतील दवावर पिकवण्यात आलेल्या सेंद्रिय पावट्याच्या शेंगांचा हंगाम सुरू झाला आहे. मोंगा पार्टीसाठी पावट्याच्या शेंगांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून त्यामुळे दरही वाढले आहेत.
येथील गावात पावट्याच्या शेंगाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. बहुचर्चित मोंगा लावण्यासाठी या शेंगाचा वापर केला जातो. भातशेतीनंतर त्याच शेतजमिनीवर पावट्याचे बियाणे टाकण्यात येत; मात्र त्यासाठी पाणी न घालता या काळात येणाऱ्या थंडीतील दवाच्या पाण्यावर हे पीक घेतले जाते. त्यामुळे ते चविष्ट आणि उत्तम दर्जाचे असते. या पावट्याच्या शेंगांना वेगळा सुंगध असतो. गोवळकोट हे गाव वाशिष्ठी नदीकिनारी आहे. त्यामुळे येथील जागा पाणथळ आहे. नदीकिनारी असलेल्या शेतामध्ये पावट्याचे पीक घेतले जाते.
फेब्रुवारी अखेरपासून पावट्याच्या शेंगा बाजारात येऊ लागल्याने ग्राहक या शेंगा घेण्यास आतूर झाले आहेत. पावट्यासह वालाच्या शेंगा व चवळीच्या शेंगांसाठी येथील माती आणि हवामान खूप उपयुक्त आहे. त्यामुळे येथील शेतकरी पालेभाजीसह थंडीत पडणाऱ्या दवावर हे पीक घेतात. प थंडी व दव पडल्याने पावटा, वाल व चवळीच्या शेंगांच्या पिकांमध्ये भरघोस वाढ झालेली आहे; मात्र या पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप मेहनत घेऊन शेताची राखण करावी लागते. फेब्रुवारीपासून मोंगा पार्टीचे आयोजन केले जाते. त्यासाठी गोवळकोटमधील पावट्याच्या शेंगांना जास्त मागणी आहे. ३०० रुपये किलोप्रमाणे या शेंगा विकल्या जातात. पावटा, वाल व चवळीच्या शेंगांमुळे शेतकऱ्यांना ४० ते पन्नास हजार रुपयाचे उत्पन्न मिळते. चवळीच्या शेंगांचा एका किलोचा दर १२० रुपये तर वालाच्या शेंगांचा एका किलोचा दर दीडशे रुपये असा आहे.

कोट
चार महिन्यांत येणाऱ्या या दवावर पिकलेल्या वालाचा उत्तम दर्जा असून, त्याला भौगोलिक मानांकन देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. भातशेतीनंतर त्याच शेतजमिनीवर पावटा बियाणे टाकण्यात येते; मात्र त्यासाठी पाणी न घालता या काळात येणाऱ्या थंडीतील दवाच्या पाण्यावर हे पीक घेतले जाते. त्यामुळे ते चविष्ट आणि उत्तम दर्जाचे असते. गोवळकोटमधील पावट्याला वेगळा सुगंध असतो. त्याची चवदेखील वेगळीच असते. त्यामुळे गोवळकोटच्या पावट्याला भौगोलिक मानांकन मिळायला हवे.
- जफर कटमाले, नागरिक, गोवळकोट
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

Latest Marathi News Live Update: अमरावती प्रकरणात 8 व्हिडिओ समोर; अल्पसंख्याक आयोगाचा तपास सुरू

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 1,300 अंकांनी वाढला; Vedanta Limited शेअर्स चर्चेत

SCROLL FOR NEXT