rat12p15.jpg-
50810
रत्नागिरी ः बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापनाच्या कर्मचारीविरोधी धरणे आंदोलनात उपस्थित बॅंकेचे कर्मचारी.
---------
महाबँक कर्मचाऱ्यांची रत्नागिरीत धरणे
विविध मागण्या ; एकदिवसीय देशव्यापी संपाचा इशारा
रत्नागिरी, ता. १२ः बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापनाच्या कर्मचारीविरोधी व मनमानी धोरणांविरोधात पुकारलेले कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन आज बँक ऑफ महाराष्ट्रच्या झोनल ऑफिस-रत्नागिरीसमोर यशस्वी झाले. या आंदोलनातील पुढील टप्प्यात २० मार्चला बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा देशव्यापी संप घोषित करण्यात येईल, असा इशारा बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन कोल्हापूर संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
नोकरभरती, द्विपक्ष बोलणी पुर्नस्थापित करा, उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, मान्यताप्राप्त संघटनेबरोबरील कराराची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, व्यवसायवृद्धीसाठी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत मीटिंग बोलवा या व इतर मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचारी गेले महिनाभर आंदोलन करत आहेत. या आंदोलनात प्रथम बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना सर्व शाखांमधून कर्मचाऱ्यांच्या सह्यांची निवेदने पाठवण्यात आली. रत्नागिरीतील झोनल ऑफिससमोर महाबँकेतील कर्मचारी आज सकाळपासूनच धरणे आंदोलनाला बसले होते.
चौकट
बॅंकेचे नकारात्मक धोरण
बँकेचे नकारात्मक धोरण अशाच पद्धतीने चालू राहिले तर एप्रिल महिन्यामध्ये हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेमार्फत देण्यात आला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. आंदोलनाचे नेतृत्व उपाध्यक्ष राजेंद्र गडवी व भाग्येश खरे या संघटनेच्या प्रतिनिधींनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.