-rat१२p३०.jpg -
P२५N५०८९९
दापोली ः ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारे कंपोस्ट युनिट मुख्याध्यापकांकडे सूपर्द करताना मान्यवर.
-----
जालगाव-ब्राह्मणवाडी शाळेला
खतनिमिर्तीसाठी कंपोस्ट युनिट
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १४ ः तालुक्यातील जालगांव ग्रामपंचायतींतर्गत माझी वसुंधरा अभियान सुरू आहे. याचाच एक विशेष भाग म्हणून जालगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जालगाव- ब्राह्मणवाडी शाळेला मिलिंद शेठ आणि मयुरेश शेठ यांच्या आर्थिक सहयोगाने ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारे कंपोस्ट युनिट देण्यात आले.
जालगावमधील जिल्हा परिषदेच्या तिन्ही शाळांमध्ये ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचे युनिट बसवण्यात आल्याची माहिती सरपंच अक्षय फाटक यांनी दिली. जालगाव आदर्श केंद्र शाळा नं. १ येथे झालेल्या कार्यक्रमात हे कंपोस्ट युनिट मुख्याध्यापक गणेश पवार यांना सुपूर्द केले. या वेळी सरपंच अक्षय फाटक, माझी वसुंधरा अभियानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे, समिती सदस्य शिरीष देसाई, ग्रामपंचायत सदस्य शोभा दांडेकर, चारूता आठल्ये, प्रसाद फाटक, मयूर मोहिते आदी उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.