कोकण

जालगावमध्ये हॉर्नबिलच्या पहिल्या घरट्याचा शोध

CD

जालगावमध्ये हॉर्नबिलच्या
पहिल्या घरट्याचा शोध
दापोली, ता. १२ः दापोलीत मलबार पाइड हॉर्नबिलच्या पहिल्या घरट्याचा शोध जालगाव येथे वाईल्ड अॅनिमल रेस्क्युअर संघटनेने लावला आहे. त्या घरट्याला संरक्षित करण्याचे काम संघटनेमार्फत सुरू आहे.
जालगाव येथील नंदकुमार झाडेकर यांच्या बहिणीच्या घराच्या बाजूच्या झाडावर हे घरटे सापडल्याचे वाईल्ड अॅनिमल रेस्क्युअर संघटनेचे सचिव तुषार महाडिक यांनी सांगितले. या पक्ष्याला मराठीत मलबारी कवड्या धनेश असे म्हटले जाते. हा पक्षी सदाहरित आणि पानगळीच्या जंगलात आढळतो; मात्र, जंगलाजवळील लहान नागरी भागातही झाडांवर आढलतो. मलबार पाइड हॉर्नबिलचा विणीचा हंगाम एप्रिल ते जून या कालावधीत असतो. हे पक्षी आयुष्यभरासाठी एकाच जोडीदारासोबत राहतात. अन्य धनेश पक्ष्यांप्रमाणे याची मादीदेखील स्वतःला झाडाच्या ढोलीत अंडी घालण्यासाठी बंद करून घेते. मादी १ ते ३ अंडी घालते आणि अंडी घातल्यापासून पिल्ले घरट्याबाहेर येण्यास ९० दिवसांचा कालावधी लागतो. या काळात नर तिला घरट्याच्या लहानशा फटीतून अन्न पुरवतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सायबर फसवणुकीचा नवा फंडा, दहशतवाद्यांशी संबंध असल्याची भीती दाखवून महिलेला घातला 73 लाखाचा गंडा

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक पे 69000 रुपये, वार्षिक वाढ 6 टक्के; 51 पानांचं निवेदन

'तन्वीने मूर्खपणा केला…''त्या' वक्तव्यामुळे प्रेक्षक नाराज, नेटकरी म्हणाले...'हिला वोट करु नका'

Radhanagari Bee Attack: रक्षाविसर्जनाला कावळ्याची वाट पाहणं पडलं महागात! कावळ्यासोबत मधमाशा आल्या अन्; १०० जखमी तर १२ गंभीर, लोकांना पळता भुई थोडी, व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: नेस्को सेंटर मध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणात लायझनिंग करणारा इंद्रजीत सिंग याला तात्काळ अटक करा; मनसेची मागणी

SCROLL FOR NEXT