rat१२p२९.jpg-
२५N५०८९८
रत्नागिरी- महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या, यासह अन्य मागण्यांसाठी बौद्ध बांधवांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने.
----
महाबोधी महाविहारासाठी रत्नागिरीत निदर्शने
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : बौद्ध बांधवांनी महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले.
महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी १९९२ पासून आंदोलन होत आहेत. तरीसुद्धा महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा बदलण्यात आला नाही. जागतिक वारसा म्हणून मान्यताप्राप्त बौद्धगया येथील महाविहार व्यवस्थापन कायदा तातडीने बदलण्यात यावा, या प्रमुख मागणीसह एकूण सहा मागण्या केल्या आहेत. भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी यांच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे निवेदन सादर केले. या वेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष गौतम गमरे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष अनंत सावंत, काका जोशी, विजय जाधव, माजी महासचिव प्रशांत कदम, वंचितचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, वी. बी. मोहिते, रत्नदीप कांबळे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.