कोकण

करून होलिकेला नमन, करूया व्यसनांचे दहन!

CD

51110

करून होलिकेला नमन, करूया व्यसनांचे दहन!

कणकवलीत आदर्श होळी ः नशाबंदी मंडळ, पदर प्रतिष्‍ठानचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १४ : ‘होलिकेला नमन करून व्यसनांचे दहन करूया’ असा संदेश देत येथे आदर्श होळीचे दहन केले. नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग आणि पदर प्रतिष्ठानने छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा उपक्रम राबविला.
उत्सव आला की व्यसनही सोबत आलीच पाहिजेत असा रिवाज अलीकडे मोठ्या प्रमाणात सगळीकडे सुरू आहे. हा रिवाज मोडीत काढून व्यसनांना प्रतिबंध घालून आनंददायी उत्सव साजरा करावा या उद्देशाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आदर्श होळी उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमात नशाबंदी मंडळ जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर म्‍हणाल्या की, ‘‘व्यसनमुक्त महाराष्ट्र, सक्षम महाराष्ट्र व्हावा, यासाठी व्यसनमुक्तीच्या कार्यात सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे. राज्यात सध्यस्थितीत व्यसनांची परिस्थिती भयावह आहे. सर्वांनी सहकार्य केले तरच व्यसनांना अटकाव करता येईल.’’
यावेळी अभिनेत्री अक्षता कांबळी आणि पदर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण यांनी दारु, गुटखा, सिगारेट, अमली पदार्थ, गांजा, अफू, ड्रग्स, चरस यांची वेष्टणे, आवरणे या सर्व व्यसनांची प्रतिकात्मक होळी पेटवली. मेघा गांगण यांनी ‘‘व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत,’’ असे आवाहन केले.
यावेळी नशाबंदी मंडळ अध्यक्षा अर्पिता मुंबरकर, महिला दक्षता समितीच्या रोजा खडपकर, पदर महिला प्रतिष्ठान सचिव सुप्रिया नलावडे, प्रियाली कोदे, लीना काळसेकर, संजना सदडेकर, साक्षी वाळके, अंकिता कर्पे, राजश्री रावराणे, संपदा पारकर, प्रणाली चव्हाण, भारती पाटील, शांती सावंत, मनीषा मयेकर, पल्लवी करपे, पूजा माणगावकर, गोसावी मॅडम, स्वानंदी कोदे, याज्ञवी कोदे उपस्थित होत्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT