कोकण

गणपतीसाण्याचे नूतनीकरण करा

CD

51111

गणपतीसाण्याचे नूतनीकरण करा

बिजलीनगरवासीयांची मागणी : मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.१४ : शहरातील बिजलीनगर, तेलीआळी परिसरातील सुमारे तीनशे गणेशमूर्ती गडनदीपात्रातील मराठा मंडळ येथील गणपती साणा येथे आणल्या जातात. त्‍याअनुषंगाने गणेशोत्‍सवापूर्वी नदीपात्रातील येथील गणपतीसाण्याचे नूतनीकरण व्हावे अशी मागणी बिजलीनगर येथील रहिवाशांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्‍यांनी मुख्याधिकारी गौरी पाटील यांना दिले.
मराठा मंडळ येथील बंधारा तसेच तेथील गणपती साणा परिसराची पाहणी मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केली. यावेळी येथील माजी नगरसेवक सुशांत नाईक यांच्यासह बिजलीनगर येथील रहिवाशांनी मुख्याधिकारी पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्‍यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्‍हटले आहे की, ‘‘येथील गणपती साण्याची दूरवस्था झाली आहे. त्‍यामुळे गणेशमूर्ती विसर्जन करताना भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्‍यामुळे येथील गणपती साण्याची गणेशोत्‍सवपूर्वी दूरूस्ती होऊन नूतनीकरण करावे.’’ माजी नगरसेवक सुशांत नाईक, सुहास परब, अक्षय परब, गौरेश डिचोलकर, महेश कोदे, अजित काणेकर, लक्ष्मण हाण्णीकोड आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

Vidarbha Heatwave : विदर्भात उन्हाची लाट कायम; अकोला-अमरावती राज्यात ‘हॉट’, पुढचे चार दिवस 'येलो अलर्ट'

MPSC Success Story भावंडांची स्पर्धा परीक्षेत भरारी! पल्लवीची धर्मादाय विभागात, तर पंकजची महसूल सहाय्यक पदाला गवसणी, सातत्य अन् कठोर मेहनतीचे फळ..

यंदाचा मे महिना 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर ! ट्रिपल राजयोगाचा फायदा, पैशांची बरसात आणि करिअरमध्येही होणार प्रोमोशन

Land Measurement: शेतकऱ्यांना दिलासा! जमीन मोजणीमध्ये तंत्रज्ञानाची क्रांती, प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार, ५२ रोव्हर यंत्रांमुळे कामाला गती..

SCROLL FOR NEXT