51113
पाण्यासाठी कातकरींची वणवण
सत्यशोधक संघटना ः फोंडाघाटप्रश्नी प्रशासनाला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.१४ : फोंडाघाट (ता.कणकवली) येथे मोठ्या संख्येने आदिवासी कातकरी बांधव राहतात. त्यांना सध्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यामुळे प्रशासनाने या कातकरी बांधवांसाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सत्यशोधक संघटनेने केली आहे.
संघटनेचे ॲड. सुदीप कांबळे, कातकरी बांधव सखू पवार, दत्ताराम निकम, राजन पवार आदींनी गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, ‘‘फोंडाघाट गांगोवाडी येथे अनेक वर्षांपासून कातकरी बांधव राहतात. मात्र त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही. तेथील नाले आटल्याने दोन ते तीन किलोमिटर अंतर जाऊन या कातकरी बांधवांना झऱ्याचे पाणी आणावे लागते. गेली पाच वर्षे येथील कातकरी बांधव पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी निवेदने देत आहेत. मात्र अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. सध्या तीव्र उन्हाळा असल्याने कातकरी बांधवांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
---
‘पुढे कार्यवाही झालीच नाही’
दरम्यान, दोन वर्षांत केलेल्या पाठपुराव्यामुळे फोंडाघाट गांगो वस्तीपर्यंत वीज खांब बसवून कातकऱ्यांच्या प्रत्येक घरापर्यंत वीज मिटर बसविण्यात आले. घरपत्रक उतारा ग्रामपंचायतीने दिला. तसेच वस्तीच्या अर्ध्या भागापर्यंत योजनेची जलवाहिनी आणली आहे. मात्र, पुढे पाणी पुरवठ्यासाठी कार्यवाही झालेली नाही. त्यासाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदारांनाही निवेदने दिल्याचे संघटनेने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.