51153
करंजेश्वरीच्या पालखीने
शोधली ४० शेरणे
वाशिष्ठीच्या तीरावर भाविकांची गर्दी ; गोवळकोटमध्ये होम
चिपळूण, ता. १४ ः संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला श्री देव सोमेश्वर आणि श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगोत्सवातील शेरणे कार्यक्रमास शहरातील पेठमाप वाशिष्ठी नदीच्या तीरावर भक्तांचा जनसागर उसळला. लपवलेली ४० शेरणे शोधून काढत देवीने आपला महिमा दाखवला आहे.
देवी करंजेश्वरीचे पेठमाप हे माहेर असून, आपल्या माहेरात होणारा हा कार्यक्रम भाविकांसाठी जिव्हाळ्याचा मानला जातो.
दरवर्षी पेठमाप येथे वाशिष्ठीच्या तीरावर पिवळ्या हळदीच्या फडक्यात नारळ बांधून त्याच्यावर नाव टाकून ते शेरणे लपवले जाते. त्यानंतर देवी हे शेरणे शोधून काढते. एक लांबलचक काठी त्या काठीला वरती मोरपिसांचा गुच्छ बांधलेला असतो. एक व्यक्ती काठी घेऊन शेरणे शोधण्याचे काम करतो. मागून देवीची आणि सोमेश्वराची पालखी आणि भाविक असतात. मनात नवस बोलून लपवलेली शेरणे शोधून काढली तर भाविकांची मनोकामना पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे.
यावर्षी १३१ शेरणे लपवली होती. त्यातील ४० शेरणे शोधण्यात आली. पेठमापहून शेरणे शोधण्यासाठी देवी करंजेश्वरी आणि श्रीदेवी सोमेश्वर यांच्या पालख्या ढोलताशाच्या गजरात आल्यानंतर अलोट गर्दी झाली. पाच वाजल्यानंतर शेरणे शोधण्यास सुरवात झाली. शेरणे कार्यक्रमानंतर देवस्थानच्या दोन्ही पालख्या गोवळकोटच्या दिशेने रवाना झाल्या. त्यानंतर शुक्रवारी (ता. १४) सकाळी सात वाजता गोवळकोट सहाणेजवळचा होम पेटवण्यात आला.
चौकट
महाबली हनुमान ठरले आकर्षण
यावर्षी देवीचे शेरणे शोधणे कार्यक्रमामध्ये पालखीसोबत महाबली हनुमानाची वेशभूषा अतिशय आकर्षक ठरली. ती पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. बाहुबली हनुमंतरायासाठी खास एक उंच रंगमंच बनवला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.