कोकण

जागतिक ग्राहक दिनानिमित्त सोमवारी कणकवलीत जागृती

CD

जागतिक ग्राहक दिनानिमित्त
सोमवारी कणकवलीत जागृती

पलकमंत्री नीतेश राणेंची उपस्थिती शक्य

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १४ ः जिल्हा पुरवठा कार्यालय सिंधुदुर्गनगरी आणि कणकवली तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता.१७) रोजी सकाळी १०.३० वाजता जागतिक ग्राहक दिनानिमित्त कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाला मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तसेच पालकमंत्री नीतेश राणे यांना निमंत्रित केले आहे. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, जिल्हा पुरवठा अधिकारी आरती देसाई, प्रांताधिकारी जगदीश कातकर आदी उपस्थित राहणार आहेत.
या ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहकांना आपले हक्क आणि जबाबदारी या विषयी मान्यवरांचे मार्गदर्शन आयोजित केले आहे. यात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे सदस्य योगेश खाडीलकर, ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष आणि राज्य सदस्य प्रा. एस. एन. पाटील, पोलिस ठाणे सिंधुदुर्गनगरीचे प्रथमेश गावडे, भारतीय मानक ब्युरोचे पुष्पेंद्र मिश्रा, अन्न आणि औषध प्रशासनचे विजय पाचपुते, जिल्हा ग्राहक आयोगाचे माजी प्रभारी अध्यक्ष कमलाकांत कुबल आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. याचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

Vidarbha Heatwave : विदर्भात उन्हाची लाट कायम; अकोला-अमरावती राज्यात ‘हॉट’, पुढचे चार दिवस 'येलो अलर्ट'

MPSC Success Story भावंडांची स्पर्धा परीक्षेत भरारी! पल्लवीची धर्मादाय विभागात, तर पंकजची महसूल सहाय्यक पदाला गवसणी, सातत्य अन् कठोर मेहनतीचे फळ..

यंदाचा मे महिना 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर ! ट्रिपल राजयोगाचा फायदा, पैशांची बरसात आणि करिअरमध्येही होणार प्रोमोशन

Land Measurement: शेतकऱ्यांना दिलासा! जमीन मोजणीमध्ये तंत्रज्ञानाची क्रांती, प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार, ५२ रोव्हर यंत्रांमुळे कामाला गती..

SCROLL FOR NEXT