लंगडीमध्ये मांडकी शाळा अव्वल
सावर्डे, ता. १४ : सावर्डे येथील डेरवण येथील क्रीडा संकुलात सुरू असलेल्या युथ गेम्समध्ये लंगडी खेळात चिपळूण तालुक्यातील मांडकी शाळेने अव्वल स्थान प्राप्त केले.
१२ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम तर याच वयोगटातील मुलींमध्ये द्वितीय आणि १५ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम व याच वयोगटातील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. १५ वर्षांखालील मुलांमध्ये विनीत घाणेकर या खेळाडूने उत्कृष्ट खेळाडू म्हणून स्थान मिळवले. १२ वर्षांखालील मुलांमध्ये गद्रे स्कूलने प्रथम, मांडकी शाळेने द्वितीय क्रमांक मिळवला. गद्रे स्कूलचा संकल्प सकपाळ हा उत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. १२ वर्षांखालील मुलींच्या गटात पालवण शाळेने प्रथम, मांडकी शाळेने द्वितीय क्रमांक मिळवला. या गटात पालवण शाळेची पूर्वी भुवड ही उत्कृष्ट खेळाडू ठरली. १५ वर्षांखालील मुलांच्या गटात मांडकी शाळेने प्रथम तर समता क्रीडाभवन या प्रशालेने द्वितीय क्रमांक मिळवला. १५ वर्षांखालील मुलींच्या गटात शिर्के हायस्कूल प्रथम तर मांडकी शाळा द्वितीय आली. या गटात शिर्के हायस्कूलची वैष्णवी फुटक ही विद्यार्थिनी उत्कृष्ट खेळाडू ठरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.