swt183.jpg
N51924
पिंगुळी ः गुढीपूर येथील दुर्गेश मसके फाउंडेशन आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ''दुर्गेश श्री''चा मानकरी संदेश सावंत ठरला. (छायाचित्र ः अजय सावंत)
संदेश सावंत ‘दुर्गेश श्री’चा मानकरी
पिंगुळीतील शऱीरसौष्ठव स्पर्धाः शुभम हळदिवे ‘बेस्ट प्रोझर’
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ः पिंगुळी गुढीपूर येथील दुर्गेश मसके फाउंडेशन आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘दुर्गेश श्री’चा मानकरी संदेश सावंत (बीएमसी बांदा) ठरला. पाच वजनी गटात या स्पर्धा घेण्यात आल्या. बेस्ट प्रोझर शुभम हळदिवे (सरवांजी फिटनेस) याची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स आणि सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने दुर्गेश मसके फाउंडेशन गुढीपूर आयोजित जिल्हास्तरीय ‘दुर्गेश श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन येथील ठाकरवाडी आदिवासी कलाग्रामच्या रंगमंचावर करण्यात आले. (कै.) दुर्गेश मसके यांच्या स्मरणार्थ ही पहिली स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेला पाचही गटातून स्पर्धकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असाः ५० ते ६० वजनी गट-विपुल करलकर (गिअर अप जिम पिंगुळी), पराग बोंद्रे, वासुदेव वैज (टीम शिवाजी जिम), दीप भोगले (सरवांजी फिटनेस), उदय जाधव (बीएमसी). ६० ते ६५ वजनी गट-शेरबहादुर बोगटी (जोकर फिटनेस), वेदांत केरकर (बीएमसी),अँदनन करल (गिअर अप जिम पिंगुळी), स्वप्नील पेडणेकर (म्युझिक क्रिएशन), सागर काळप (गिअर अप पिंगुळी). ६५ ते ७० वजनी गट-सागर लटम (गिअर अप पिंगुळी), ओंकार कारेकर (सरवांजी फिटनेस), देवराज नाईक (बॉडी टेम्पल), कौस्तुभ ठाकूर (गिअर अप पिंगुळी). ७० ते ७५ वजनी गट-संदेश सावंत (बीएमसी), हेमंत चव्हाण (सातेरी जिम) यांनी मिळविला. मोस्ट इम्प्रोवड रामदास राऊळ (टीम शिवाजी) यांची निवड करण्यात आली.
परीक्षण राष्ट्रीय पंच आशिष वर्तक, शगुन सावंत यांनी केले. विजेत्या संदेश सावंत यांना ''दुर्गेश श्री'' किताबाने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सर्व गटातील विजेत्यांना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत विविध पोझ दाखवित सर्वांची वाहवा मिळविलेला चिमुकला शौर्य ठाकर आकर्षण ठरला. लोककलाकार गणपत मसगे, फाउंडेशनचे अध्यक्ष गुंडू मसके, सचिव संतोष मसके, राष्ट्रीय पंच आशिष वर्तक, शगुन सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे खजिनदार साईराज जाधव, भास्कर गंगावणे, रणजित रणसिंग, राजेश सिंगनाथ, संजय सामंत, शिवदास मसगे, बाळकृष्ण मसगे, सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे पदाधिकारी शिवाजी जाधव, ज्ञानेश्वर आळवे, जयवंती मसगे, गायत्री मसगे, आनंदी ठाकूर, तुळशीदास मसके, विठ्ठल मसके, सुनयना मसगे, दत्तप्रसाद रसनकुटे, कृष्णा मसके, शेखर राठोड, तनिषा राठोड, साईप्रसाद चव्हाण, संदेश ठाकर, साक्षी ठाकर, दिलीप मसके, सागर ठाकूर, सौम्या ठाकर, मंथन रणसिंग, पारस बावलेकर, अमेय गंगावणे, संस्कार मसके आदी उपस्थित होते. निवेदन अमर प्रभू यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.