कोकण

ढोल ताशांच्या गजरात कसबा येथे रॅली

CD

ढोल ताशांच्या गजरात
कसबा येथे रॅली
संगमेश्वरः छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कसबा मोहल्ला ते कसबा हायस्कूलपर्यंत रॅली काढण्यात आली. कसबा येथील शिवभक्त आणि मंडळाच्या वतीने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम करण्यात येतात. यावर्षीही शिवजयंतीनिमित्त कसबा ते मोहल्लापर्यंत शिवप्रतिमेची वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. माजी सभापती सुजित महाडिक आणि मंडळींसह मान्यवर या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडवू नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवला होता
------
‘बाल आशीर्वाद’ अशी
कोणतीही योजना नाही
रत्नागिरी : महिला व बाल विकास विभागाकडून ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ अशा नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नसून हा संदेश केवळ अफवा आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवून आर्थिक नुकसान होणार नाही, याबाबत दक्षता बाळगावी. अशा अफवा असलेल्या सोशल मीडिया पोस्टवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी केले आहे. ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ अशी योजना असल्याचे भासवून समाजमाध्यमांद्वारे काही संदेश प्रसारित होत आहेत. नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये व फसवणुकीला बळी पडू नये.
.....
सुवर्णदुर्ग किल्ल्यावर
स्वच्छता मोहिम
दापोलीः क्षेत्रीय कार्यालयासाठी शंभर दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्यावतीने सुवर्णदुर्ग किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता मोहिममध्ये उपविभागीय अधिकारी श्री. सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, नायब तहसीलदार आडमुठे, महसूल विभागाचे कार्यालयीन सर्व कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते. सुवर्णदुर्ग किल्ल्यावर वाढलेले गवत काढून स्वच्छता करण्यात आली. तसेच आतील व बाहेरील प्लास्टिकच्या बॉटल्स व इतर कचरा गोळा करून नष्ट करण्यात आला.
--------
आविष्कार संस्थेतील
विद्यार्थ्यांना फळांचे वाटप
रत्नागिरी : आमदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे रत्नागिरीतील आविष्कार संस्थेचे सविता कामत विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांना फळवाटप करण्यात आले. कार्यक्रमाला भाजप जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, चिटणीस अशोक वाडेकर, भाई जठार, नित्यानंद दळवी, पिंट्या देसाई, स्वाभिमान रिक्षा संघटनेचे पदाधिकारी शरद पालकर, अनिल पावसकर, तुषार देसाई, संजीव बने, अशोक पावसकर, गोट्या सावंत, मुख्याध्यापिका मानसी कांबळे, व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताची ३७ जहाजं होर्मुझमध्ये अडकून, देशात कच्च्या तेलाचा साठा किती? खतांचे काय? पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितली आकडेवारी

Pune Land Action: शर्तभंग झालेल्या ३० भूखंडांवर सरकारची मोठी कारवाई; पुणे-पिंपरीत कोट्यवधींच्या जमिनी ताब्यात, २०० कोटींची मालमत्ता जप्त

Latest Marathi News Live Update : दिल्लीत 'क्वाड'च्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक

देऊळ बंद २ ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, 5 दिवसात कमावले तब्बल 'इतके कोटी'

Chhatrapati Sambhajinagar: पैठणचे गोदापात्र पडले कोरडेठाक; घाण, कचरा सडून परिसरात दुर्गंधी; धार्मिक विधींना मोठा फटका

SCROLL FOR NEXT