कोकण

अवैध धंद्यांना चाप लावण्यासोबत वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न

CD

५२०२९
जिल्ह्यातील अवैध धंद्यांना चाप लावणार
अपर पोलिस अधीक्षक डॉ. बच्चू ः पदभार स्वीकारला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः अमली पदार्थांची तस्करी, शस्त्रांचा वापर करणाऱ्यांवर पोलिस कारवाईची धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांना चाप लावण्यासोबतच पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची ग्वाही नूतन अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांनी दिली. मावळत्या अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्याकडून त्यांनी आज पदभार स्वीकारला. मूळचे आंध्र प्रदेशातील कडप्पा गावचे रहिवासी असलेले धीरजकुमार २०१९ बॅचचे आयपीएस आहेत. २०२०-२०२१ मध्ये प्रशिक्षण कालावधीत पेठवडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून कामकाज पाहिल्याने कोल्हापूर जिल्ह्याची त्यांना माहिती आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून त्यांनी कारकीर्द सुरू केली होती. येथेही त्यांनी सहायक पोलिस अधीक्षक म्हणून दमदार कामगिरी बजावली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये मिळालेल्या पदोन्नतीवर ते कोल्हापूरला रुजू झाले आहेत.

सोशल मीडियावर वॉच
पेठवडगावमध्ये असताना जुगार अड्डे, महामार्गालगतचे वेश्या व्यवसाय कायमचे बंद केले होते. संघटित गुन्हेगारी रोखण्यासह अमली पदार्थांची तस्करी, सोशल मीडियावरून गुन्हेगारीला दिले जाणारे प्रोत्साहन यावर विशेष लक्ष असणार आहे. अवैध व्यवसाय कोणत्याही स्थितीत सुरू ठेवले जाणार नाहीत, असा इशाराच डॉ. धीरजकुमार यांनी दिला. मावळत्या अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. देसाई यांच्यासह पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. धीरजकुमार यांचे स्वागत केले.

कोट
कोल्हापूर जिल्हा करवीर निवासिनी अंबाबाईचे ठिकाण असून, भाविक, पर्यटकांचा मोठा ओढा आहे. जिल्ह्याला सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा असल्याने येथे काम करताना अभिमान वाटतो आहे. भविष्यात जिल्ह्यासाठी भरीव कामगिरी करण्याची इच्छा आहे.
- डॉ. धीरजकुमार बच्चू, अपर पोलिस अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Qualifier 1: विराट कोहलीने GT विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ची चिंता वाढवली... समोर आले धक्कादायक अपडेट्स

चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित 'गव्हर्नर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! मनोज वाजपेयींची मुख्य भूमिका

Alandi Temple Security : आळंदीतील दानपेटी चोरी प्रकरणानंतर देवस्थान प्रशासन सतर्क: व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांकडून खुलासा

Eid Al-Adha 2026: भारतात बकरी ईद 27 मे की 28 मे रोजी साजरी होणार? जाणून घ्या नेमकी तारीख आणि भारतात कुठे, कशी साजरी होते ईद

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

SCROLL FOR NEXT