कोकण

रत्नागिरीःक्राइम

CD

किटकनाशक प्यायल्याने
नेपाळी महिलेचा मृत्यू
रत्नागिरीः तालुक्यातील सैतवडे येथील नेपाळी महिलेने आंब्यावर फवारणीसाठी आणलेले कीडनाशक पिले. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागलेल्याने खंडाळा येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. उर्मिला मायाराम लोनिया (वय ४०, रा. सैतवडे, बोरसई मोहल्ला, रत्नागिरी. मूळ ः तिथिंपुरचरा जि. कैलाली, नेपाळ) असे मृत महिलेचे नाव आहे.
--------
मद्यपान करणाऱ्या
तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरीः चंपक मैदान येथील सार्वजनिक ठिकाणी झाडाच्या आडोशाला मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. गोबरे चिनगुद भारती (वय ३५, रा. एमआयडीसी, मिरजोळे, रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १७) रात्री साडेआठच्या सुमारास चंपक मैदान येथील झाडीच्या आडोशाला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित झाडाच्या आडोशाला मद्यपान करत असताना पोलिसांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रूपेश भिसे यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
--------
वृद्धेच्या पायांना मॉलिश
करतो सांगून दुखापत
रत्नागिरीः दारूच्या नशेत वृद्ध महिलेच्या पायाला मॉलिश करतो, असे सांगून तिला दुखापत करणाऱ्या संशयिताविरुद्ध लांजा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अशोक महादेव चव्हाण (वय ५५, रा. पालू, चव्हाणवाडी, ता. लांजा) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १५) रात्री आठच्या सुमारास पालू चव्हाणवाडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राज नारायण राणे (वय ३५, रा. पालू, चव्हाणवाडी, लांजा) यांची आई सरिता नारायण राणे (वय ७०) या घरात हॉलमध्ये बसल्या होत्या तर त्यांची बहीण आशा तुळसणकर ही घरात जेवण करत होती. त्या वेळी वाडीतील अशोक चव्हाण हा दारूच्या नशेत तेथे आला व सरिता राणे यांना तुमच्या पायांना मी मॉलिश करून देतो, असे सांगितले. वृद्ध महिलेने नकार दिला. तरीदेखील संशयिताने त्यांच्या पायांना मॉलिश करून दुखापत केली. या प्रकरणी राज राणे यांनी लांजा पोलिसात तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Qualifier 1: विराट कोहलीने GT विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ची चिंता वाढवली... समोर आले धक्कादायक अपडेट्स

चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित 'गव्हर्नर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! मनोज वाजपेयींची मुख्य भूमिका

Alandi Temple Security : आळंदीतील दानपेटी चोरी प्रकरणानंतर देवस्थान प्रशासन सतर्क: व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांकडून खुलासा

Eid Al-Adha 2026: भारतात बकरी ईद 27 मे की 28 मे रोजी साजरी होणार? जाणून घ्या नेमकी तारीख आणि भारतात कुठे, कशी साजरी होते ईद

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

SCROLL FOR NEXT