कोकण

कोदवलीवासीय लोकवर्गणीतून बांधणार बंधारा

CD

-rat१८p२६.jpg, rat१८p२८.jpg -
२५N५१९६९
राजापूर ः कोरडे झालेले नदीपात्र.
-rat१८p२७.jpg -
२५N५१९७०
राजापूर ः पावसाळ्यामध्ये दुथडी भरून वाहणारी नदी.
---------
सुखद काही ..................लोगो

कोदवलीवासीय लोकवर्गणीतून बांधणार बंधारा
१४ लाखांचा खर्च ; टंचाईवर कायमस्वरूपी उपाय
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ ः तालुक्यातील कोदवली मांडवकरवाडीतील ग्रामस्थांना दरवर्षी एप्रिल-मे महिन्यामध्ये तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीटंचाईची ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ग्रामविकास सेवा संस्था, मांडवकरवाडी (रजि.) या संस्थेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी कोदवली नदीवर सिमेंट काँक्रिटचा बंधारा बांधण्याचा निर्धार करण्यात आला असून, त्यासाठी यासाठी १४ लाख रुपये निधीची आवश्यकता आहे. शासन मदतीची अपेक्षा न करता येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमविण्यास सुरवात केली आहे.
ग्रामस्थांच्या या प्रयत्नांना विविध सामाजिक संस्था आणि समाजातील दानशूर व्यक्तींच्या सकारात्मक मदतीचे बळ मिळत आहे. १६५ कुटुंबे आणि ५५० लोकवस्ती असलेल्या मांडवकरवाडीला पाणीपुरवठा करण्यासाठी नळपाणी योजना राबवण्यात आली आहे. त्यासाठी नदीपात्रालगत विहीर बांधण्यात आलेली आहे. मात्र, उन्हाळ्यात नदीपात्र कोरडे झाले की नदीपात्रालगत बांधलेल्या विहिरी आटतात. वाडीमधील तीन-चार विहिरींची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.
या बंधाऱ्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्‍या नळपाणी योजनेच्या नदीपात्रालगतच्या मुख्य विहिरीची पाण्याची पातळी वाढण्याच्यादृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. त्याच्या जोडीने गावातील अन्य विहिरींनाही त्याचा फायदा होणार आहे. निधी उभारण्याच्या प्रयत्नांना विविध सामाजिक संस्था, समाजातील दानशूर व्यक्तींचेही पाठबळ मिळत आहे. तरीही निधी उभारणे आव्हानात्मक असल्याने विविध सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन ग्रामविकास सेवा संस्था, मांडवकरवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
---
चौकट ः
येथे करा मदत
कोदवली मांडवकरवाडी येथे बंधारा बांधण्यासाठी मदतनिधी उभारण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेने मदतनिधी लिंक ( https://vvki-dsy.org/Mandavkar-Wadi) तयार केली आहे. या लिंकच्या माध्यमातून जमा होणारा निधी ग्रामविकास सेवा संस्था, मांडवकरवाडी (रजि.) या संस्थेला प्राप्त होणार आहे. त्यामुळे बंधारा बांधण्यासाठी मदत निधी देऊ इच्छिणाऱ्या सामाजिक संस्था वा दानशूर व्यक्तींनी या लिंकवर संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामविकास सेवा संस्था, मांडवकरवाडी (रजि.) या संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
------------
कोट ः
बंधाऱ्यासाठीच्या १४ लाख रुपये निधीसाठी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, श्री श्री रवीशंकर यांची आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था, कोदवलीतील अन्य वाड्यांमधील ग्रामस्थ यांसह अन्य विविध सामाजिक संस्था आणि समाजातील दानशूर व्यक्तींचेही सकारात्मक पाठबळ मिळत आहे. सामाजिक संस्था वा दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात दिल्यास निश्‍चितच निधी उभारणीचे काम अधिक सोपे होणार आहे.
- विलास पळसमकर, सेक्रेटरी, ग्रामविकास सेवा संस्था, मांडवकरवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी : ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात एन्ट्री; उप कर्णधाराची जबाबदारी, वैभव सूर्यवंशीही संघात...

CNG Shortage: पालघरमध्ये सीएनजीचा तीव्र तुटवडा! ३ किमी लांब वाहनांच्या रांगा, इंधनासाठी ५ तास चालक प्रतिक्षेत

Repo Rate News: होम लोन आणि FD गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! RBI व्याजदर बदलणार का? मोठा निर्णय लवकरच

"कास्टिंग काऊचमुळे लेकीने इंडस्ट्री सोडली" अभिनेत्रीने व्यक्त केली खंत "आता जगावंसं वाटत नाही"

Maharashtra Weather: अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला, आगमन लांबणीवर? शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

SCROLL FOR NEXT