कोकण

रत्नागिरी ः कळझोंडीत वणवा लागून ३ लाखाचे नुकसान

CD

कळझोंडीत वणव्याने तीन लाखांचे नुकसान
७५ कलमे होरपळली; विद्युत तारांच्या घर्षणामुळे ठिणगी पडल्याचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ः तालुक्यातील कळझोंडी-डालाचा पऱ्या येथे लागलेल्या वणव्यात आंबा बागायतदार दीपक सखाराम पवार यांच्या बागेतील ७५ कलमे जळून गेली. यामध्ये त्यांचे ३ लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. विद्युत तारांच्या घर्षणामुळे पडलेल्या ठिणगीतून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ही घटना शुक्रवारी (ता. २१) दुपारी साडेतीनच्या सुमारास डालाचा पऱ्या येथे घडली. आंबा बागेतून मोठ्या प्रमाणात आग लागली असल्याचे लक्षात येताच शेजारी असलेले उद्योजक प्रकाश पवार यांच्या बागेतील रखवालदार प्रमोद पवार यांना तातडीने मोबाईलद्वारे माहिती दिली. ही माहिती मिळताच उद्योजक, स्थानिक नेते प्रमोद पवार पाण्याची टाकी व वणवा आटोक्यात आणण्यासाठी कामगारांसह दाखल झाले. बागेला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले.
या आगीमुळे आंबा बागायतदार दीपक पवार यांचे तीन लाखांचे नुकसान झाले. या घटनेचा पंचनामा करण्यासाठी कळझोंडी गावच्या तलाठी स्नेहल लोंढे, सहकारी लिपिक दीपक वीर, सरपंच दीप्ती वीर, उपसरपंच प्रकाश पवार, सामाजिक कार्यकर्ते किशोर पवार, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष संदीप पवार यांनी पाहणी केली.

चौकट
वारंवार वणवे लागण्याचे प्रकार
कळझोंडी आर. के. मुळ्ये ते कळझोंडी जिल्हा परिषद धरण येथे महावितरण कंपनीची विद्युत वाहिनी गेली असून या लाईनवरील आजूबाजूच्या झांडाच्या फांद्या आलेल्या आहेत. त्यामुळे या परिसरात अनेकदा विद्युत तारांचे घर्षण होऊन वणवे लागल्याचे प्रकार घडतात, असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. डालाचा पऱ्या येथील लागलेली आगही तशीच असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test : मोहम्मद सिराजच्या 'या' कृतिचा अर्थ काय? जाणाल तर भावनिक व्हाल, Video Viral

Latest Marathi News Updates: पुणे स्लीपर सेल मॉड्युल प्रकरणी अकरावी अटक

महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहणार! असोसिएशनकडून राज्यव्यापी बंदची घोषणा, कधी आणि का?

लाल समुद्रात दहशत! जीव वाचवण्यासाठी जहाजांच्या रडारवर मुस्लिम असल्याचे मेसेज; धर्म विचारुन केलं जातंय लक्ष्य

Amazon Prime Day Sale: आला रे आला अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ आला; मध्यरात्रीच सुरू होतोय धडका, मोठी संधी चुकवू नका!

SCROLL FOR NEXT