कोकण

जिल्ह्यातील 28 शेतकऱ्यांनी केली जमिनीची आदलाबदल

CD

जमिनीची २८ शेतकऱ्यांकडून अदलाबदल
शासनाची सलोखा योजना; राज्यात १,११९ तर सिंधुदुर्गात ३६ नोंदी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : शासनाने शेतकऱ्यांसाठी अतिशय सुलभ अशी ‘सलोखा’ योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे करत शेतजमीन अदलाबदल करता येते. या दस्तासाठी मुद्रांक शुल्क एक हजार रुपये व नोंदणी शुल्क एक हजार रुपये आकरले जाते. जिल्ह्यातील २८ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. सिंधुदुर्गातील ३६ जणांनी हा लाभ घेतला असून, राज्यात सुमारे १ हजार ११९ शेतकऱ्यांनी सलोखा योजनेंतर्गत जमीन अदलाबदल केली आहे.
यात शेतकऱ्यांच्या १० कोटी ५ लाख रुपयांच्या नोंदणी व मुद्रांक शुल्काची बचत झाली. सर्वाधिक ८४ शेतकऱ्यांची नोंदणी परभणी व बुलढाणा जिल्ह्यात झाली. ही योजना ३१ जानेवारीला संपुष्टात आली. शेतजमिनीचे वाद टाळण्यासाठी व आपापसांत सलोखा निर्माण करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ही योजना जानेवारी २०२३ मध्ये अंमलात आणली. यात सहभागी होण्यासाठी पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान १२ वर्षांपासून असावा, अशी अट घातली होती. रत्नागिरी जिल्ह्यात याला प्रतिसाद मिळाला. मुद्रांक शुल्क विभागाने याला दुजोरा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT